ind vs aus 4th t20 australia squad changes sean abbott travis head out
भारताने रविवारी (२ नोव्हेंबर) झालेल्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या चमूतून तीन खेळाडूंना रिलिज करण्यात आले आहे.
'ॲशेस' मालिकेच्या तयारीसाठी ट्रॅव्हिस हेड आणि सीन ॲबॉट यांना टी-२० संघातून मुक्त करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, तनवीर संघा याला वनडे कप सामन्यात खेळण्यासाठी सोडण्यात आले आहे. दुखापतीतून सावरलेला बेन ड्वारशुइस संघात परतला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या बहुप्रतिक्षित 'ॲशेस' मालिकेच्या तयारीला ऑस्ट्रेलियाने सुरुवात केली आहे. यासाठी ट्रॅव्हिस हेड आता शेफिल्ड शील्ड स्पर्धेत साऊथ ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना दिसणार आहे. हेड वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर (जुलैमध्ये) आपला पहिला प्रथम-श्रेणी सामना खेळणार असून, तो पुढील आठवड्यात होबार्ट येथे तस्मानियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
गेल्या महिन्यात व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये हेडची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. ऑगस्टमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध १४२ धावा केल्यानंतर, टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधील त्याच्या आठ डावांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या केवळ ३१ अशी राहिली आहे.
जोश हेजलवुडच्या जागी भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात खेळलेल्या सीन ॲबॉटलादेखील 'शेफिल्ड शील्ड'मध्ये न्यू साऊथ वेल्सकडून व्हिक्टोरियाविरुद्ध खेळण्यासाठी मुक्त करण्यात आले आहे. त्याला 'ॲशेस' मालिकेसाठी जखमी कर्णधार पॅट कमिन्सचा पर्यायी खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. हेजलवुड आणि ॲबॉट यांच्यासह स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि नॅथन लियॉन 'ॲशेस'साठी खेळताना दिसतील, तर त्यांच्याविरुद्ध स्कॉट बोलँड खेळेल.
लेग-स्पिनर तनवीर संघाला सोमवारी (३ ऑक्टोबर) सिडनीमध्ये क्वीन्सलँडविरुद्ध होणाऱ्या 'वनडे कप' स्पर्धेत न्यू साऊथ वेल्सकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन टी-२० संघातून मुक्त करण्यात आले आहे. दुसऱ्यांदा पिता बनणाऱ्या ॲडम झाम्पा याचा पर्यायी खेळाडू म्हणून त्याची भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवड झाली होती.
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन, टिम डेविड, बेन ड्वारशुइस, नॅथन एलिस, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, बेन मॅकडरमॉट.