भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मंधाना. File Photo
स्पोर्ट्स

ICC Women's ODI Rankings : स्मृती मंधानाची नंबर-१ वरून घसरण; हरमनप्रीत कौरचे टॉप-१० मध्ये दमदार पुनरागमन

दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने पुन्हा एकदा नंबर-१ चे स्थान पटकावले

पुढारी वृत्तसेवा

ICC Womens ODI Rankings : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मंधाना हिची महिला आयसीसी (ICC) वनडे फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावरून घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हिने तिला मागे टाकत पुन्हा एकदा नंबर-१ चे स्थान पटकावले आहे.

हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्माच्या क्रमवारीत मोठी सुधारणा

झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताची माजी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांच्या क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. फलंदाजांच्या यादीत हरमनप्रीत दोन स्थानांनी वर जात आठव्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर दीप्ती शर्माने चार स्थानांची झेप घेत २३ व्या क्रमांकावर धडक मारली आहे. या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी दुसऱ्या वनडे सामन्यात शानदार शतके झळकावली होती.

नियमित सराव केल्यामुळेच फॉर्म गसवसला: हरमनप्रीत कौर

दीप्ती शर्माशी संवाद साधताना हरमनप्रीत कौरने सांगितले होते की, नियमित सराव केल्यामुळेच तिला फॉर्मात परत ॲडजस्ट होण्यात यश आले. हरमनप्रीत म्हणाली, 'मी घरी असताना कसून सराव केला होता. तुम्ही जितकी जास्त फलंदाजी करता, तितका तुमचा आत्मविश्वास उंचावतो. मी एका दिवसात सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन सत्रांमध्ये फलंदाजीचा सराव केला.'

फिटनेससाठी अधिक वेळ द्यावा लागतो

'माझ्या खेळण्याच्या शैलीनुसार मला नेहमीच अधिक सरावाची गरज असते. माझ्या वयाचा विचार करता मला माझ्या तंदुरुस्तीवर (फिटनेस) अधिक वेळ द्यावा लागतो. यासोबतच मी फलंदाजीचाही भरपूर सराव केला. घरच्या मैदानावर घालवलेल्या त्या सराव सत्रांमुळे मला मैदानात मोठी मदत झाली.'

प्रतिकाची कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंग

भारतीय खेळाडूंमध्ये युवा फलंदाज प्रतिका रावल हिलाही या रँकिंगचा मोठा फायदा झाला आहे. तिने तब्बल सात स्थानांची छलांग लगावत आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंग गाठली आहे. प्रतिका रावल आता महिला फलंदाजी क्रमवारीत २१ व्या स्थानावर पोहोचली आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाला फायदा

दुसरीकडे, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी एका स्थानाचा फायदा झाला आहे. शेफाली आता तिसऱ्या, तर मंधाना चौथ्या स्थानावर विराजमान झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT