स्पोर्ट्स

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची तारीख जाहीर, 'इथे' होणार सामना

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुढील वर्षी क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या (World Test Championship final) तारखा जाहीर केल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल ११ ते १५ जून २०२५ दरम्यान लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर कसोटी खेळवली जाईल. जर आवश्यकता पडल्यास १६ जून हा राखीव दिवस म्हणून उपलब्ध असेल, असे आयसीसीने म्हटले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल पहिल्यांदाच लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल साउथहॅम्प्टन येथे २०२१ मध्ये झाली होती. त्यानंतर दुसऱ्या चॅम्पियनशिपची फायनल ओव्हल येथे २०२३ मध्ये झाली होती. अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी ही फायनल जिंकली होती.

जागतिक क्रमवारीतील अव्वल दोन संघांमध्ये हा सामना खेळला जाईल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारत सध्या ऑस्ट्रेलियाच्या पुढे अव्वल स्थानी आहे. सध्या जागतिक क्रमवारीत न्यूझीलंड तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या, श्रीलंका पाचव्या, दक्षिण आफ्रिका सहाव्या आणि बांगलादेश सातव्या स्थानी आहे.

२०२३ मध्ये ऑस्‍ट्रेलियाने जिंकली होती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन

२०२३ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ऑस्‍ट्रेलियाने आपल्‍या नावे केली होती. सलग दुसर्‍यांदा कसोटी विश्‍वचषकाच्‍या अंतिम सामन्‍यात धडक मारणार्‍या टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चषक पटकविण्‍याचे स्‍वप्‍न गेल्या वर्षी भंगले होते.ऑस्‍ट्रेलियाने अंतिम सामना २०९ धावांनी जिंकत कसोटी विश्‍वचषक आपल्‍या नावावर केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT