Banana Scam BCCI Notice  Canva Image
स्पोर्ट्स

Banana Scam BCCI Notice | ३५ लाखाच्या केळी घोटाळ्यात बीसीसीआयला नोटीस; काय आहे संपूर्ण प्रकरण?

बीसीसीआय एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. करोडो रूपयाच्या घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटनेला नोटीस पाठवण्यात आली आहे.

Anirudha Sankpal

Banana Scam BCCI Notice :

भारतानं आशिया कपमधील पहिल्या सामन्यात युएईचा पराभव करत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र दुसरीकडं बीसीसीआय एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. करोडो रूपयाच्या घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटनेला नोटीस पाठवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यात लाखो रूपये हे फक्त केळ्यांवर खर्च झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय आहे आणि त्याच्याशी बीसीसीआयचा काय संबंध आहे?

खरं तर या घोटाळ्याचा मुख्य संबंध हा उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनशी आहे. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनमध्ये १२ कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. देहरादून येथे राहणाऱ्या संजय रावत या व्यक्तीनं ही याचिका दाखल केली आहे. यावर सध्या सुनावणी सुरू आहे. असोसिएशनमधील कथित करोडो रूपयांच्या घोटाळ्याबाबत नैनीकाल उच्च न्यायालयानं कडक ताशेरे ओढले आहेत. याबाबत उच्च न्यायालयानं बीसीसीआयला देखील नोटीस पाठवली आहे. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी ही शुक्रवारी होणार आहे.

काय आहे पूर्ण प्रकरण?

संजय रावत यांनी उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनविरूद्ध याचिका दाखल केली आहे. त्यांनी असोसिएशन घालून दिलेल्या नियमांप्रमाणे काम करत नाही. ते निधीचा गैरवापर करत आहे. रावत यांच्या दाव्यानुसार असोसिएशनला १२ कोटी रूपये खेळाडूंच्या विकास आणि क्रिकेट आयोजनासाठी मिळाले होते. त्यांनी या निधीचा चुकीचा वापर केला आहे. त्या निधीतून खेळाडूंना कोणत्याही सोयी सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत असा आरोप केला.

बाहेरच्या CA कडून ऑडिट

रावत यांनी याचिकेत दावा केला आहे की असोसिएशनने आपल्या निधीचे ऑडिट हे आपल्या सीएकडून न करत बाहेरच्या सीएकडून करून घेतलं. याद्वारे त्यांना निधी वापरात केलेली गडबडी लपवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील सत्य बाहेर यावं यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर जस्टिस मनोज कुमार तिवारी या एक सदसीय पीठानं मंगळवारी सुनावणी घेतली. यावेळी खंडपीठानं बीसीसीआयला नोटीस बजावली आहे.

केळीसाठी खर्च झाले ३५ लाख रूपये

या संपूर्ण प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचिकाकर्त्यांनी CAU ऑडीट रिपोर्टचा हवाला देत सांगितलं की खेळाडूंनी तब्बल ३५ लाख रूपयांची केळी खाल्ली आहेत. खाणे- पिणे आणि कँपच्या नावावर करोडो रूपयांचा खर्च करण्यात आलाय. मात्र वास्तवात खेळाडूंसाठी इतका खर्च झाला नसल्याचा दावा रावत यांनी केलाय. जर या प्रकरणातील सर्व आरोप सिद्ध झाले तर उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनविरूद्ध मोठी कारवाई होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT