India Womens Cricket Team Meet PM Modi:
भारतीय महिला क्रिकेट संघानं वर्ल्डकप ट्रॉफीसह बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याचा व्हिडिओ आज गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्याशी गप्पा गोष्टी करत त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी संघातील खेळाडू हरलीन देओलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक असा प्रश्न विचारला जो ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोक्याला हातच लावला.
भारतीय महिला संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटला त्यावेळी या भेटीदरम्यान प्रमुख प्रशिक्षक अमोल मुजुंमदार यांना भावना अनावर झाल्या. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणाले, 'आम्ही गेल्या दोन वर्षापासून काम करत होतो. शेवटी हा दिवस आला.' कर्णधार हरमनप्रीत कौरने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१७ साली झालेल्या भेटीचा उल्लेख केला.
पंतप्रधानांच्या सर्व खेळाडूंशी निखळ गप्पा सुरू असतानाच हरलीन देओलनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक वेगळा प्रश्न विचारला. हरलीन देओलनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या स्कीनकेअर रूटीनबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोक्याला हातच लावला.
हरलीन म्हणाली, सर मला तुम्हाला तुची स्कीन केअर रूटीन विचारयची आहे. तुम्ही खूप ग्लो करता सर..' यावर सर्व खेळाडू हसू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील डोक्याला हात लावला. त्यावर पंतप्रधान मोदींनी या विषयावर माझं जास्त लक्ष गेलं नाही. त्यानंतर स्नेह राणानं सर हे करोडो देशवासीयांचे प्रेम आहे असं म्हटलं. यावर ते तर आहेच असं म्हणत पंतप्रधानांनी त्यांच्या आशीर्वादाचा प्रभाव तर असतोच असं सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्ही खेळाडूंनी खूप मोठं काम केलं आहे. क्रिकेट खेळ नाही तर आपल्या देशात ते लोकांचं आयुष्य आहे. क्रिकेटच्या मैदानात काही चांगलं झालं की संपूर्ण भारत चांगलं फील करतो. जर क्रिकेटच्या मैदानात जरा जरी इकडं तिकडं झालं तर संपूर्ण देश हादरतो. तुम्ही तीन सामने हरल्यानंतर ट्रोलिंग सेना तुमच्या पाठीमागे लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिप्ती शर्मा, अमनजोत कौर, क्रांती गौड, जेमिमाह रॉड्रिग्ज यांच्या वैयक्तिक कामगिरीवर देखील भाष्य केलं.