Hardik Pandya Ruled Out: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरूद्धच्या वनडे मालिकेला मुकणार आहे. याबाबतीच माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका १३ जून पासून सुरू होत आहे. पहिला सामना धरमशाला इथं १३ जूनला होणार आहे. तर दुसरा १७ जून रोजी लखनौमध्ये आणि शेवटचा तिसरा वनडे सामना २० जून रोजी चेन्नईत होणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्याला सीओईने यापूर्वी फिट घोषित केलं होतं. त्याबाबतचं प्रमाणपत्र देखील बीसीसीआयकडे सादर करण्यात आले होते.
मात्र आता माहिती मिळत आहे की, 'सीओईने पांड्याला फिट घोषित केलं आहे. त्यांनी दोन दिवस आधी बीसीसीआयकडे फिटनेस प्रमाणपत्र देखील पाठवलं आहे. मात्र पांड्याच्या फायनल सेशनपूर्वी सीओई सोडण्यापूर्वी पांड्याला पुन्हा फिटनेससंबंधी अडचणी जाणवू लागल्या.'
यापूर्वी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांना वनडे मालिकेसाठी फिट घोषित करण्यात आले होते. या दोघांचा देखील वनडे संघातील समावेश हा फिटनेस सर्टिफिकेट आल्यानंतरच होणार होता.
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांना आयपीएल सामन्यांवेळी दुखापत झाली होती. रोहित शर्मा आपल्या दुखापतीतून सावरला असून तर अष्टपैलू पांड्या त्याच्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता. याच जोडीला विराट कोहली देखील आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाला. त्याच्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळं तो अफगाणिस्तानविरूद्धच्या वनडे मालिकेला मुकला आहे.
विराट कोहलीच्या ऐवजी यशस्वी जैस्वालला संघात स्थान देण्यात आलं आहे. आता हार्दिक पांड्याला कोण रिप्लेस करतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्ष दुबे, केएल राहुल, इशान किशन, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार