Hardik Pandya Mahika Sharma stadium viral video file photo
स्पोर्ट्स

Hardik Pandya: हद्द झाली! भर मैदानात हार्दिक आणि माहिकाने ओलांडली मर्यादा; वर्ल्ड कपच्या स्टेजवरच.., रोमँटिक Video व्हायरल

Hardik Pandya Mahika Sharma T20 World Cup stadium viral video: हार्दिक पंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा यांचा मैदानावरील रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Hardik Pandya Mahika Sharma T20 World Cup stadium viral video:

अहमदाबाद: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवत तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. संपूर्ण देश या विजयाचा जल्लोष करत असतानाच, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा यांचा मैदानावरील रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातील त्यांच्या वागण्यामुळे अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवत तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली. सामन्यानंतर संपूर्ण संघ आणि कुटुंबीय मैदानावर विजयाचा जल्लोष करत होते. याच दरम्यान हार्दिक पंड्या आणि माहिका शर्मा यांनीही एकत्रितपणे आनंद साजरा केला. स्टेडियममध्ये दोघे एकमेकांचा हात धरून आनंद व्यक्त करताना दिसले, तर माहिकाने हार्दिकला किस केल्याचेही कॅमेऱ्यात कैद झाले. पण खरी चर्चा रंगली ती त्यांच्या स्टेजवरील एका व्हिडिओमुळे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक आणि माहिका टी20 वर्ल्ड कपच्या पुरस्कार वितरणासाठी बनवण्यात आलेल्या मुख्य मंचावरच (पोडियम) झोपले होते. दोघे एकमेकांशी बोलण्यात मग्न असताना त्यांच्या रोमँटिक क्षणांचे दृश्य कॅमेऱ्यात टिपले गेले. मैदानावरील त्यांचे असे वागणे चाहत्यांना रुचलेले नाही.

विराट-अनुष्कासोबत तुलना

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी हार्दिक आणि माहिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी याला 'पब्लिसिटी स्टंट' म्हटले आहे, तर काहींनी त्यांच्यावर 'ओव्हरॲक्टिंग'चा शिक्का मारला आहे. काहींनी त्यांची तुलना विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याशी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT