स्पोर्ट्स

Hardik Pandya: 'आयुष्‍यानं लिंबू फेकून मारले, मी त्‍याचं सरबत करुन पिलं' : धमाकेदार 'कमकॅब'नंतर हार्दिक बोलला

दुखापतीतून सावरताना मानसिक कसोटीचा सामना करावा लागतो, मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात

पुढारी वृत्तसेवा

  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20I मालिकेची सुरुवात ९ डिसेंबर रोजी कटक येथे झाली

  • या सामन्‍यात हार्दिक पांड्याने धमाकेदार' खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली पुनरागमन अविस्मरणीय बनवले

  • BCCI.TV वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये पांड्याने त्‍याच्‍या पुनरागमनामागील प्रेरणा सांगितली

Hardik Pandya Interview

कटक : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20I मालिकेची सुरुवात ९ डिसेंबर रोजी कटक येथे झाली. पहिल्याच T20I सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याने धमाकेदार' खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली पुनरागमन अविस्मरणीय बनवले. ३२ वर्षीय हार्दिकने आशिया चषक स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन करताना दमदार प्रदर्शन केले.

आशिया चषक स्‍पर्धेत हार्दिक झाला होता जखमी

सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या T20 आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला दोन महिन्यांहून अधिक काळ मैदानापासून दूर राहावे लागले. मात्र, पुनरागमनाची वेळ येताच, हार्दिकने ५ सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्‍याने वादळी खेळी केली.

'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्‍कार

हार्दिक पांड्याने केवळ २८ चेंडूंमध्ये नाबाद ५९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. फलंदाजीनंतर हार्दिकने गोलंदाजीतही योगदान दिले आणि २ षटकांत १६ धावा देत एक महत्त्वपूर्ण बळी घेतला. या शानदार कामगिरीबद्दल त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आले. भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावल्यानंतर हार्दिकने आपल्या पुनरागमनाबद्दल मोठे विधान केले.

स्वतःवर प्रचंड विश्वास

BCCI.TV वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये पांड्याने सांगितले की, दुखापतीतून अधिक मजबूत आणि चांगला होऊन परत येण्याचे त्याचे ध्येय होते. दुखापतीमुळे मानसिक कसोटी लागते. मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात. मी पुन्‍हा एकदा मैदानात उतरलो याचे बरेच श्रेय माझ्या आप्तजनांना जाते . त्याने सांगितले की, एक खेळाडू म्हणून त्याला स्वतःवर खूप विश्वास आहे. त्याचे नेहमीच मत राहिले आहे की, जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल, तर दुसरे तुमच्यावर कसा विश्वास ठेवतील?

चाहत्यांचा पाठिंबा मोठा प्रेरणास्रोत

कटकच्या मैदानावर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हार्दिक भारावून गेला होता. चाहत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्यावर तो म्हणाला की, त्याला गर्दीतून एक ऊर्जा मिळते, ज्यामुळे त्याला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास मदत होते. 'तुम्ही एक रॉकस्टार असावा. तुम्ही मैदानात येता, १० मिनिटे खेळ करता आणि गर्दी वेडी होते,' हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा प्रेरणास्रोत असल्याचे सांगत तो तो म्हणाला, "आयुष्याने माझ्यावर खूप लिंबू फेकले; पण मी नेहमी त्यांची सरबत बनवण्याचा विचार केला."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT