Gukesh Magnus Carlsen Norway Chess 2025 |
नवी दिल्ली : स्टॅव्हॅन्जरमध्ये भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने फॅबियानो कारुआनाकडून नाट्यमय अंतिम फेरीत पराभव पत्करल्यानंतर मॅग्नस कार्लसनने त्याचे विक्रमी सातवे नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद पटकावले. गतविजेता कार्लसनने १६ गुणांसह कारुआना (१५.५) आणि गुकेश (१४.५) यांना आव्हानात्मक स्पर्धेत मागे टाकले. गुकेश तिसऱ्या स्थानावर राहिला.
डी. गुकेशने अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाविरुद्ध निर्णायक डावात केलेली चूक त्याला महागात पडली. या विजयामुळे कारुआनाला तीन गुण मिळाले, तर पाच वेळचा जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन याने १६ गुणांसह नॉर्वे चेस स्पर्धेचे सातवे विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील अंतिम डावात गुकेश सुरुवातीपासूनच अडचणीत होता. सामना वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याची वेळ संपत आली आणि एका चुकीने त्याचे सारे समीकरण बिघडले. शेवटच्या आणि अंतिम फेरीपूर्वी कार्लसन आणि गुकेश यांच्यात ०.५ गुणांचा फरक होता. पाच वेळा विश्वविजेता कार्लसनने या स्पर्धेत १६ गुणांसह विजेतेपद पटकावले.
मिळालेले गुण :
फॅबियानो कारुआना १५.५ गुण
डी. गुकेश – १४.५ गुण
अरुण एरिगैसी – १२.५ गुण
विजयानंतर मॅग्नस कार्लसन म्हणाला, मला खूप चांगले वाटत आहे. स्पर्धा जिंकणे हा दिलासादायक आहे. स्पर्धा खूप चढ-उतारांची होती, पण शेवटी सर्वकाही चांगले होते. भारतीय खेळाडू डी गुकेश आणि अर्जुन एरिगाईसी यांच्याबद्दल तो म्हणाला, सर्वजण खूप चांगले खेळले. मात्र त्यांना तयारीसाठी अजूनही थोडा वेळ हवा आहे. आर्मेनियामध्ये एक स्पर्धा सुरू आहे, जिथे भारताचे आर प्रज्ञानंद आणि अरविंद चिदंबरम यांनी खूप चांगले बुद्धिबळ खेळले. गुकेशविरुद्धच्या सामन्यातील पराभवाबद्दल कार्लसन म्हणाला, जरी ही चांगली आठवण नसली तरी सामना नेहमीच लक्षात राहील.