Gavaskar criticized BCCI
इंडियन प्रिमियर लीग (IPL)मुळे क्रिकेट जगताचे स्वरुपच बदलले. देशातील तरुण खेळाडूंसह परदेशातील गुणवंत क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. त्यामुळेच आयपीएलची जगभरातील लोकप्रियता वाढतच चाली आहे. अनुभवी क्रिकेटपटूसह नवखे खेळाडूही कोट्यवधी रुपये कमवत आहेत. एकीकडे आयपीएलमुळे क्रिकेटला खेळास पाठबळ मिळत असताना देशातंर्गत क्रिकेटबाबत माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी चिंता व्यक्त केली आहे. २०२५ च्या आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडूंसाठी नियम बदलल्याबद्दल गावस्कर त्यांनी बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला ४ कोटी रुपयांना कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे गावस्कर यांचा रोख धोनी संदर्भात असल्याचे मानले जात आहे.
स्पोर्टस्टारमधील स्तंभलेखनात गावस्कर यांनी म्हटलं आहे की, "मोठ्या रकमेला खरेदी केल्यानंतर, अनेक खेळाडूंची भूक आणि उत्साह कमी होतो. फ्रँचायझीला याचा काही फरक पडत नाही कारण त्यांना वाटते की, ते चांगले आहे; परंतु भारतीय क्रिकेटसाठी हे खूपच नुकसानकारक आहे. एखादा खेळाडू यशस्वी असो वा नसो, त्याच्या जाण्याने भारतीय क्रिकेटवर परिणाम होतो. गेल्या वर्षी मेगा लिलावापूर्वी महेंद्रसिंग धोनी अनकॅप्ड खेळाडू बनला. त्याला लीगमध्ये समाविष्ट करण्यासाठी मर्यादा ४ कोटींपर्यंत वाढवण्यात आली. धोनीला लीगमध्ये राहण्यासाठी अनकॅप्ड खेळाडूंसाठीचे नियम बदलण्यात आले होते, असेही गावस्कर यांचे मत आहे. त्याची मर्यादा ४ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली, असेही त्यांनी नमूद केले आहे.
"गेल्या काही वर्षांत असा कोणताही अनकॅप्ड खेळाडू आठवणे कठीण आहे ज्याला मोठ्या रकमेला खरेदी केले गेले असेल आणि त्याने संघात आपली योग्यता सिद्ध केली असेल. कदाचित पुढील काही वर्षांत तो अनुभवाने थोडा सुधारेल; पण जर तो त्याच स्थानिक लीगमध्ये खेळत असेल तर सुधारणा होण्याची शक्यता फारशी जास्त नसेल. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात रसिक दार सलाम सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला ६ कोटी रुपयांना खरेदी केले; पण या हंगामात आतापर्यंत त्याला फक्त दोनच सामने खेळता आले आहेत. गावस्कर यांच्या मते, मोठ्या किमतींसोबत उच्च अपेक्षा देखील येतात. अनेक तरुण खेळाडू हे साध्य करण्यात अपयशी ठरतात. पुढच्या वर्षी त्यांच्या किमती कमी झाल्यावर परिस्थिती सुधारू लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयने २०२१ मध्ये एक नियम रद्द केला. या नियमानुसार पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या भारतीय खेळाडूला "अनकॅप्ड" मानण्याची परवानगी नव्हती. मात्र हा नियमच रद्द झाल्याने पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या भारतीय खेळाडूला "अनकॅप्ड" मानण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघ अनकॅप्ड प्लेअर श्रेणी अंतर्गत धोनीला ४ कोटी रुपयांना खरेदी करु शकला. गेल्या वर्षी लिलावापूर्वी अनकॅप्ड प्लेअर बनलेल्या महेंद्रसिंग धोनीला सामावून घेण्यासाठी, मर्यादा ४ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली," असे गावस्कर यांनी नमूद केले आहे. तसेच या निर्णयाला त्यांनी गुणवत्तेपेक्षा सोयीचे निराशाजनक उदाहरण असल्याचे स्पष्ट केले आहे.
"यावर्षांत मोठ्या रकमेला खरेदी केलेला असा एकही खेळाडू आठवणे कठीण आहे ज्याने संघात त्याचा समावेश योग्य ठरवला असेल," असेही गावस्कर यांनी आपल्या स्तंभात नमूद केले आहे. भारतीय क्रिकेटच्या दीर्घकालीन हिताचे रक्षण करण्यासाठी गावस्कर यांनी बीसीसीआयला नियम बदल रद्द करण्याची आणि अचाट खेळाडूंसाठी पगार मर्यादित करण्याची विनंतीही केली आहे.