Abhishek Sharma Vaibhav Suryavanshi News pudhari
स्पोर्ट्स

Abhishek Sharma Vaibhav Suryavanshi News: भारतात वाघ अन् भारताबाहेर मांजर... अभिषेकसह स्टार वैभवचे माजी खेळाडूने पिळले कान

संदीप पाटील यांनी वैभव अन् अभिषेकची स्तुतीही केली मात्र परदेशातील कामगिरी सुधारण्याचा देखील दिला सल्ला

Anirudha Sankpal

Abhishek Sharma Vaibhav Suryavanshi News: अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेत अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी करत सर्वांनी मने जिंकली. भारताने मायदेशात झालेल्या मालिकेत अफगाणिस्तानला व्हाईट वॉश दिला. सगळीकडे अनेक विक्रम मोडणाऱ्या अभिषेकची वाहवा होत असताना भारताच्या माजी क्रिकेटपटूने मात्र अभिषेकसह स्टार वैभवचे कान पिळले आहेत.

भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू संदीप पाटील यांनी वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांची स्तुती केली मात्र त्याचबरोबर त्यांचे कान देखील पिळण्याचं काम केलं. त्यांनी या दोघांच्या फलंदाजीबाबतची एक काळजी बोलून दाखवली. माजी खेळाडू पाटील यांनी सांगितलं की हे दोघेही खतरनाक फलंदाज आहेत. मात्र ते परदेशात जिथं चेंडू स्विंग होतो तिथं संघर्ष करताना दिसत आहेत.

भारताने जुलै महिन्यात इंग्लंडचा दौरा केला त्यावेळी अभिषेक प्रभाव पाडण्यास अपयशी ठरला होता.. आता तो घरच्या मैदानावर खेळत आहे. ही बाब सूर्यवंशीला देखील लागू आहे. त्याने या मालिकेत पदार्पण केलं होतं. या मालिकेत अभिषेक शर्माला फक्त १३१ तर वैभव सूर्यवंशीला फक्त ४२ धावा करता आल्या आहेत.

संदीप पाटील स्पोर्ट्स नेक्स्टशी बोलताना म्हणाले की, 'मला या दोघांच्या फलंदाजीबाबत एक गोष्ट सांगायची आहे. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीचा मान राखून बोलतो की ज्यावेळी ते परदेशी दौरा करतात तिथं चेंडू स्विंग होतो तिथं त्यांना अडचणी येतात. हे दोन युवा फलंदाजांना या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागणार आहे. त्याच्यावर काम करावं लागणार आहे. घरात वाघ अन् परदेशात मांजर असं होऊ नये.'

इंग्लंडविरूद्धच्या टी २० मालिकेनंतर भारताने झिम्बाब्वेला ३-० अशी मात दिली होती. त्यावेळी सूर्यवंशी हा मालिकावीर ठरला होता. तसेच फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच देखील ठरला.

नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या टी २० मालिकेत भारताने पुन्हा ३-० अशी मालिका खिशात घातली. यात अभिषेक शर्माने ३० चेंडू शतकी खेळी केली.

याबाबत बोलताना संदीप पाटील म्हणाले की, 'मला अभिषेकच्या खेळीचं कोणतेही आश्चर्य वाटलं नाही. त्यानं शतक ठोकलं. भारताने ६ षटकात शंभर धावा केल्या. मला माहिती नाही की हे पहिल्यांदाच झालंय की गेल्या वेळी देखील झालं होतं. पुढं कधी होणार हे देखील माहिती नाही. मात्र याचे श्रेय त्याला आहेच.'

पाटील पुढे म्हणाले, 'मॉडर्न क्रिकेटमध्ये या खेळाडूंना किल लायसन्स मिळालं आहे. ते त्या लायसन्सचा पुरेपूर वापर करत आहेत. मग तो वैभव असो वा अभिषेक ते जबरदस्त खेळी करत आहेत. त्यांच्याकडे मोठी ताकद, गुणवत्ता आणि स्कील आहेत. ते या स्कील्सचा योग्यप्रकारे वापर करत आहेत. मी कायम म्हणतो की हाफ हार्टेड खेळू नका. ते तसंच करत आहेत. पहिल्या चेंडूपासून ते आक्रमक फटके मारत आहेत ते जबरदस्तच आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT