स्पोर्ट्स

FIH Nations Cup 2026 : चक दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघ बनला 'चॅम्पियन'; ४ वर्षांनंतर 'एफआयएच' जेतेपदावर कोरले नाव

FIH Nations Cup 2026 : अंतिम सामन्‍यात न्यूझीलंडचा २-० ने पराभव

पुढारी वृत्तसेवा

FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाने चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एफआयएच (FIH) नेशन्स कपचे जेतेपद पटकावले आहे. २०२२ मधील पहिल्या हंगामात चॅम्पियन बनल्यानंतर, आता २०२६ मध्ये भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयासोबतच भारतीय महिला संघाने 'एफआईएच हॉकी प्रो लीग २०२६-२७' साठी देखील क्वालिफाय (पात्रता सिद्ध) केले आहे.

पहिल्‍या सत्रातच भारतीय संघाने घेतले आघाडी

भारताने सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्येच आघाडी घेतली होती; नवनीत कौरने चौथ्या मिनिटाला तर टोप्पो या खेळाडूने १५ व्या मिनिटाला गोल डागला. यानंतर सुनेलिता टोप्पो हिने गोल करत संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. दरम्‍यान, या विजयानंतर 'एफआईएच प्रो लीग २०२४-२५' मध्ये शेवटच्या स्थानावर राहिलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने आता २०२६-२७ च्या हंगामासाठी क्वालिफाय केले आहे. ही स्पर्धा २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस (LA) ऑलिम्पिकसाठी क्वालिफायर (पात्रता फेरी) असणार आहे. त्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा मानला जात आहे.

संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही

विशेष म्हणजे, भारतीय महिला हॉकी संघाने या संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता (अजेय राहत) हे जेतेपद पटकावले आहे. भारताने या स्पर्धेची सुरुवात अमेरिकेविरुद्धच्या ३-२ अशा विजयाने केली होती. यानंतर जपान आणि उरुग्वेचा पराभव करत संघाने उपांत्य फेरीत जागा मिळवली. भारतीय संघाने उपांत्य फेरीत (सेमीफायनल) चिलीचा ६-० असा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT