स्पोर्ट्स

FIFA WC EngvsIran : इंग्लंडने इराणला चिरडले, डागले 6 गोल!

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषकाचा आज (दि. 21) दुसरा दिवस आहे. ब गटात इंग्लंडचा सामना इराणशी होत आहे. खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. इंग्लंडने पहिल्या हाफमध्ये वर्चस्व राखत तीन गोल डागले. तर दुस-या हाफच्या 63 आणि 71 व्या मिनिटाला दोन गोल करून आघाडी वाढली. या दरम्यान इराणने 65 व्या मिनिटाला एक गोल करण्यात यश आले.

रॅशफोर्डने मैदानात उतरताच गोल केला

70 व्या मिनिटाला मैदानात आलेल्या मार्कस रॅशफोर्डने 71व्या मिनिटाला कर्णधार हॅरी केनच्या पासवर शानदार गोल केला. केनला 75व्या मिनिटाला बाहेर बोलावून त्याच्या जागी कॅलम विल्सनला मैदानात उतरवण्यात आले.

इंग्लंडकडून एकाच वेळी चार बदल

इंग्लंडने 70 व्या मिनिटाला चार बदल केले. हॅरी मॅग्वायर दुखापतीमुळे बाहेर पडला. त्याच्या जागी एरिक डायरला मैदानात पाठवण्यात आले. डायरशिवाय मार्कस रॅशफोर्ड, जॅक ग्रीलिश आणि फिल फोडेन यांना मैदानात उतरवले होते. इंग्लंडने दोन गोल करणारा बुकायो साका, एक गोल करणारा रहीम स्टर्लिंग आणि मेसन माऊंट यांना बाहेर बोलावले.

इराणचा पहिला गोल

इराणसाठी मेहदी तारेमीने पहिला गोल केला. घोलिजादेहच्या पासवर त्याने उत्कृष्ट गोल केला. याचबरोबर इराणने इंग्लंडची आघाडी एका गोलने कमी करण्यात यश मिळवले.

बुकायो साकाचा दुसरा गोल

इंग्लंडने 62 व्या मिनिटाला इराणविरुद्ध 4-0 अशी आघाडी घेतली. बुकायो साकाने संघासाठी चौथा आणि वैयक्तीक दुसरा गोल केला नोंदवला. रहिम स्टर्लिंगच्या पासवर त्याने गोलजाळे भेदले.

रहिम स्टर्लिंगचे वर्चस्व

इराणचा गोलरक्षक जखमी झाल्यानंतर 14 मिनिटांचा इंज्युरी टाईम देण्यात आला. त्यामुळे 45 मिनिटांचा पूर्वाध संपल्यानंतर दोन्ही संघांना 14 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळाला. या वेळेचा फायदा उठवत इंग्लंडच्या रहिम स्टर्लिंगने गोल जाळे भेदले. त्याने 45+1 मिनिटात इंग्लंडची आघाडी 3-0 ने वाढवली. कर्णधार हॅरी केनच्या पासवर स्टर्लिंगने अप्रतिम गोल केला. विश्वचषकातील त्याचा हा पहिलाच गोल ठरला.

बुकायो साकाचा गोल

बुकायो साकाने इंग्लंडची आघाडी दुप्पट केली. त्याने 43व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल केला. हॅरी मॅग्वायरच्या पासवर साकाने डाव्या पायाने फटकावलेला चेंडू थेट गोलपोस्टमध्ये पाठवला.

ज्युड बेलिंगहॅमने इंग्लंडचे खाते उघडले..

इंग्लंडचा युवा खेळाडू ज्युड बेलिंगहॅमने 35 व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल केला. ल्यूक शॉच्या पासवर त्याने हवेत उसळलेला चेंडू कौशल्यापूर्ण हेडरद्वारे गोलपोस्टमध्ये पाठवला. त्याच्या हेडरवरून आलेल्या या गोलमुळे इंग्लंडने सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.

अर्धा तास खेळ संपला

अर्ध्या तासाचा खेळ संपला तरी दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. इंग्लंडच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी इराणवर आक्रमण केले. ते गोलपोस्टच्या अगदी जवळ येत पोहचत होते, पण त्यांचे प्रयत्नांना यश आले नाही. दुसरीकडे इराणीयन खेळाडूंना फुटबॉलवर ताबा मिळवणे कठीण जात असल्याचे दिसले.

स्टेडियमबाहेर तिकिटांवरून गोंधळ

काही चाहते तिकिटावरून खलिफा स्टेडियमबाहेर गोंधळ घालत होत आहेत. चाहते स्टेडियमवर (England vs Iran) प्रवेश मिळवण्यासाठी FIFA अॅपवरून त्यांची तिकिटे दाखवताना त्यांना तांत्रिक अडचण येत होती. फिफाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात FIFA ने सांगितले की, "काही प्रेक्षकांना FIFA तिकीट अॅपद्वारे तिकिटे मिळवण्यात समस्या येत आहेत. आम्ही या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. दरम्यान, ज्या चाहत्यांना त्यांचे मोबाईल तिकीट अॅक्सेस करता येत नाही त्यांनी त्यांचा ईमेल तपासावा. समस्या नसल्यास तेथे देखील निराकरण केले, ते काउंटरवर मदत घेऊ शकतात.

सामन्यादरम्यान इराणचा गोलकीपर जखमी

सामन्यादरम्यान इराणच्या गोलरक्षकाला दुखापत झाली. त्यामुळे सामना बराच वेळ थांबला होता. गोलकीपरच्या चेहऱ्यातून रक्त येत होते. अलीरेझा बेरनवंदवर मैदानावरच उपचार करण्यात आले. त्यानंतर सामना सुरू झाला. त्याच्या जागी बॅकअप गोलकीपरला होसेनीला मैदानात उतरवण्यात आले. तो प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलकिपिंग करणार आहे.

दोन्ही देशाचे संघ

इंग्लंड : जॉर्डन पिकफोर्ड (गोलकीपर), जॉन स्टोन्स, हॅरी मॅग्वायर, किरन ट्रिपियर, डेक्लन राइस, ज्यूड बेलिंगहॅम, मेसन माउंट, ल्यूक शॉ, बुकायो साका, हॅरी केन, रहीम स्टर्लिंग.

इराण : अलिरेझा बैर्नवंद (गोलकीपर), सादेग मोहररामी, एहसान हजसाफी, मिलाद मोहम्मदी, अलिरेझा जहाँबख्श, मुर्तझा पौरलीगंजी, मेहदी तारेमी, रुझबेह चेश्मी, अली करीमी, माजिद होसेनी, अहमद नूरल्लाही.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT