Brydon Carse Nightclub Snub pudhari
स्पोर्ट्स

Brydon Carse Nightclub Snub: इंग्लंडमध्ये पुन्हा नाईट क्लब राडा; स्टार गोलंदाजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, स्टोक्सही उपस्थित

Anirudha Sankpal

England Fast Bowler brydon carse Handcuffed Outside Nightclub: इंग्लंड आणि सनाईजर्स हैदराबादचा स्टार गोलंदाज ब्रायडन कार्स मोठ्या वादात अडकला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी कार्सला डर्बीच्या एका नाईट क्लबबाहेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. असं असलं तरी कार्सला अटक करण्यात आलेली नाही. त्याला काही वेळाने सोडून देण्यात आलं अन् तो टीम हॉटेलमध्ये परतला.

ही घटना शनिवार रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रायडन कार्स इंग्लंडच्या संघाच्या ड्युटीवर नव्हता. तो काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये डरहमकडून खेळत होता. मात्र या घटनेमुळं आता पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या संघाचे टेन्शन वाढले आहे. व्हायरल व्हिडिओनुसार कार्स नाईट क्लबच्या बाहेर चार पोलीस अधिकाऱ्यांच्या गराड्याच होता. त्याच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या होत्य. डरहम आणि इंग्लंडच्या संघातील त्याचा साथीदार मॅथ्यू पॉट्स त्याच्यासोबत चर्चा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे नाईट क्लबमध्ये राडेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला बेन स्टोक्स देखील तिथं उपस्थित होता.

नाईट क्लबमध्ये नेमकं काय झालं?

टेलिग्राफ स्पोर्टच्या वृत्तानुसार ब्रायडन कार्सवर एका व्यक्तीने ड्रिंक्स सांडली होती. त्यानंतर इंग्लंडचा क्रिकेटपटू कार्स आणि त्या व्यक्तीमध्ये वाद झाला होता. मात्र यासाठी पोलीस बोलवण्यात आली नव्हती. हे पोलीस अधिकारी आधीपासूनच क्लबबाहेर उपस्थित होते.

या वादात पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्सला काही काळासाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र त्याला अधिकृतरित्या अटक करण्यात आली नव्हती. या घटनेचे मुख्य कारण आणि पोलिसांनी कार्सला बेड्या ठोकण्याचा निर्णय का घेतला याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे काय मत?

ब्रायडन कार्स इसीबीच्या केंद्रीय करारात सामील असलेला खेळाडू आहे. त्यामुळं तो जरी सध्या इंग्लंड संघाच्या ड्युटीवर नसला तरी तो अजून बोर्डाला बांधील आहे. इसीबीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, 'आम्हाला डर्बीमध्ये काल रात्री झालेल्या कथित घटनेची माहिती आहे. आम्ही याबाबत अधिक तपास करत आहे. शक्य झालं तर या प्रकरणाची पुढची माहिती दिली जाईल.' हे प्रकरण क्रिकेट रेग्युलेटरकडे देखील पाठवलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच कार्सवर कारवाई होणार की नाही हे समजेल.

या घटनेपूर्वी ब्रायडन कार्सने डरहमकडून डर्बीशायरविरूद्ध काऊंटी चॅम्पियनशिपचा सामना खेळला होता. डरहमने तिसऱ्या दिवशी दमदार विजय मिळवला होता. बेन स्टोक्सने दुसऱ्या डावात १७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. डर्बीशायरचा संघ ८४ धावात गुंडाळला होता. कार्सने या सामन्यात २ विकेट्स घेतल्या होत्या. सामन्यानंतर संघातील काही खेळाडू डर्बीमध्ये विजय साजरा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी नाईट क्लबबाहेर हा प्रकार घडला.

वाद आणि कार्स

ब्रायडन कार्सने यापूर्वी देखील शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. २०२४ मध्ये क्रिकेट रेग्युलेटरने त्यांना तीन महिन्यासाठी बॅन केलं होतं. तपासात असं दिसून आलं होतं की कार्सने आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीला म्हणजे २०१७ ते २०१९ दरम्यान बीच क्रिकेटवर ३०३ सट्टे लावले होते. हा नियमभंग होता.

यानंतर कार्सने जोरदार पुनरागमन करत इंग्लंडच्या कसोटी संघातील आपलं स्थान बळकट केलं. २०२३ मध्ये कॅरेबियन दौऱ्यावर देखील मैदानाबाहेरील त्याच्या कृतीमुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT