Ayush Mhatre  Pudhari
स्पोर्ट्स

Ayush Mhatre: CSK ला मोठा धक्का! दुखापतीमुळे आयुष म्हात्रे IPL मधून बाहेर; आत 'या' खेळाडूची एन्ट्री होणार

Ayush Mhatre Injury IPL 2026: आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 मधून पूर्णपणे बाहेर झाला आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

Ayush Mhatre Injury IPL 2026: IPL 2026 च्या मध्यावर चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा 18 वर्षीय युवा फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 18 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना त्याच्या डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगला गंभीर दुखापत झाली. संघाच्या माहितीनुसार, ही दुखापत इतकी गंभीर आहे की त्याला 6 ते 12 आठवड्यांचा रिहॅब करावा लागणार आहे. त्यामुळे IPL 2026 मध्ये त्याचे पुनरागमन होणे शक्य नाही.

चांगली सुरुवात, पण अचानक धक्का

त्या सामन्यात आयुष म्हात्रे इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरला होता. त्याने आक्रमक फलंदाजी करत 17 चेंडूत 30 धावा केल्या. मात्र, एक धाव घेताना त्याला अचानक दुखापतीचा त्रास जाणवला. तरीही काही वेळ तो खेळत राहिला, ज्यामुळे आता टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

फॅन्स आणि एक्सपर्ट्सची टीका

सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांनी आणि तज्ज्ञांनी म्हटलं की, खेळाडू आधीपासून अस्वस्थ दिसत होता, तरीही त्याला खेळू देणं चुकीचं होतं.

CSK च्या अडचणीत भर

CSK संघ आधीच दुखापतींच्या समस्येला सामोरं जात आहे. वेगवान गोलंदाज खलील अहमदही दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे संघाचा समतोल बिघडलेला आहे. आता आयुष म्हात्रेच्या बाहेर जाण्याने संघाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

आयुष म्हात्रेची दमदार कामगिरी

आयुष म्हात्रेने IPL 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने 6 सामन्यांमध्ये 201 धावा करत संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला होता. त्याचा सरासरी 33.50 आणि स्ट्राइक रेट 177.87 इतका होता.

आता कोणाची होणार रिप्लेसमेंट?

आता मोठा प्रश्न असा आहे की, आयुष म्हात्रेच्या जागी कोण येणार? सध्या उर्विल पटेल याचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. उर्विल हा आक्रमक फलंदाज असून, त्याने T20 क्रिकेटमध्ये फक्त 28 चेंडूत शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे तो CSK साठी एक परफेक्ट रिप्लेसमेंट ठरू शकतो.

पुढील सामना आणि आव्हान

CSK चा पुढील सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर 23 एप्रिल रोजी होणार आहे. हा सामना नेहमीच चुरशीचा मानला जातो. त्यामुळे CSK कोणतीही चूक न करता योग्य निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT