MS Dhoni CSK Stake Demand: चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सीएसकेच्या मालकीमध्ये २५ टक्के हिस्सेदारी मागितली असल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर त्याने आपली मागणी कमी करत ती २० टक्क्यांवर आणली असल्याचं देखील वृत्त होतं. मात्र सीएसकेनं त्याला ५.५ टक्के हिस्सेदारी ऑफर केल्याची माहिती समोर आली होती. मात्र याबाबत दोन्ही बाजूकडून अधिकृत कोणी बोलत नव्हतं.
अखेर सीएसके फ्रेंचायजीनं यावर मौन सोडलं असून त्यांनी महेंद्रसिंह धोनीने आमच्याकडे याबाबतची कोणतीही विचारणा केलेली नाही. आम्ही याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. तसेच धोनी आणि मिस्टर एन श्रीनिवासन यांच्याशी देखील चर्चा केली आहे याबाबत आम्हाला काही माहिती नाही.' ही माहिती सीएसकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने क्रिकबझला दिली आहे.
या रिपोर्टमध्ये धोनीकडे फ्रेंचायजीचे काही शेअर्स आहेत. सीएसकेचे शेअर्स हे ओपन मार्केटमध्ये ट्रेडसाठी खुले नाहीत. कंपनी लिस्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळं ते शेअर्स खासगीरित्या ऑफ मार्केट व्यवहारातून मिळवता येतात.
धोनीकडे जवळपास एक लाखापेक्षा जास्त सीएसकेचे शेअर्स आहे असं वृत्त आहे. ही काही मोठी संख्या नाही. जवळपास ३० कोटीपेक्षा जास्त शेअर्स हे पब्लिककडे आहेत. हे फ्रेंचायजीच्या एकूण शेअर कॅपिटल्सच्या जवळपास ४० टक्के आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या कुटुंबाकडे जवळपास ५५ टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स आहेत.
धोनीच्या हिस्सेदारीची किंमत ही सध्याच्या मार्केट व्हॅल्युएशननुसार जवळपास २.६ ते ३ कोटी रूपये असेल. धोनीची अंदाजे निव्वळ संपत्ती ही जवळपास १२०० कोटीच्या आसापास असेल.
भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. त्याने सांगितलं की धोनीने शेअर्समध्ये हिस्सेदारी मागितली असल्याचे वृत्त वास्तवाला धरून वाटत नाही. ही एक प्लॅन स्टोरी असल्याची शंकाच जास्त आहे.
चोप्रा युट्यूब चॅनलवरून बोलताना म्हणाला की, 'चेन्नई सुपर किंग्ज हा एक अत्यंत गांभिर्य असलेला ब्रँड आहे. त्याचे एकूण मुल्य जवळपास १.८ बिलियन आहे. धोनीने जर २५ टक्के हिस्सेदारी मागितली असेल तर ते शक्य नाही. कारण कोणीही कोणाला ४०० मिलियन देणार नाही.
खरं तर तुम्हाला २५ टक्के शेअर्स हवे असतील तर तुम्हाला ४०० मीलियन गुंतवावे लागतील. ही खूप मोठी रक्कम आहे. कोणीही आयपीएल टीमचे २५ टक्के शेअर्स देणार नाही.