cristiano ronaldo pudhari
स्पोर्ट्स

cristiano ronaldo saudi escape: रोनाल्डोचा सौदीतून काढता पाय.... अर्ध्या रात्री प्रायव्हेट जेटनं गाठलं स्पेन

Iran Israel War: रियादमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला होताच परदेशी नागरिक हादरले, अमेरिकेनेही दिला त्वरित मध्यपूर्व सोडण्याचा इशारा

Anirudha Sankpal

cristiano ronaldo saudi escape: मध्यपूर्व आशियात वाढत्या लष्करी संघर्षानंतर प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोबाबत धक्कादायक तर्क लावले जात आहेत. ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या जवळपास ६५० कोटी रूपयांच्या प्रायव्हेट जेटमधून अर्ध्या रात्री सौदी अरेबियातून स्पेनची राजधानी माद्रिदला पोहचला असल्याचा अंदाज लावला जात आहे. फ्लाईट ट्रॅकिंग डेटानुसार बॉम्बार्डियन ग्लोबल एक्सप्रेस ६५०० या विमानानं सायंकाळी ८ वाजदा रियादवरून उड्डाण केलं. त्यानंतर जवळपास सात तासांनी रात्री १ वाजता हे विमान माद्रिदमध्ये लँड झालं आहे.

अमेरिकेच्या दूतावासावरच हल्ला

४१ वर्षाचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आपली पार्टनर जॉर्जिना रॉड्रिगेज आणि पाच मुलांसह रियादमध्ये राहतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून रियादवर इराण सतत हवाई हल्ले करत आहे. अमेरिकेच्या दूतावासावर इराणनं ड्रोन हल्ला करून सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. त्यामुळं विदेशी नागरिक मध्यपूर्व आशिया लवकरात लवकर सोडत आहेत. फ्लाईट डेटावरून कळतं की रोनाल्डोचे प्रायव्हेट जेट इजिप्त आणि भूमध्या सागरावरून उड्डाण करत स्पेन पोहचलं.

अमेरिकेच्या विदेश विभागाने देखील सुरक्षेचे कारण देत आपल्या नागरिकांना मध्य पूर्व आशियातील देशांमधून त्वरित परतण्यास सांगितलं आहे. त्यांनी रियाद जाणाऱ्या आपल्या सर्व फ्लाईट्स अर्ध्या रस्त्यातून परत बोलवल्या आहेत.

रोनाल्डोचे ब्लॅक बीस्ट जेट

रोनाल्डोने २०२४ मध्ये आपलं गल्फस्ट्रीम जी २०० हे प्रायव्हेट जेट विकून नवीन बम्बार्डियन ग्लोबल एक्सप्रेस ६५०० विकत घेतलं होतं. याची किंमत जवळपास ६१ युरो आहे. ऑल ब्लॅक जेटमध्ये १५ प्रवासी प्रवास करू शकतात. यात लक्झरी सिटिंग, डबल बेड असलेला सूट, शॉवरची देखील सुविधा आहे. जेटवर रोनाल्डोचा लोग आणि गोल सेलिब्रेशनचे स्टीकर देखील कस्टमाईज केलं गेलेलं आहे. जॉर्जियानं नुकतेच या विमानानं मिलानचा प्रवास केला होता. याचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले होते.

रोनाल्डो जखमी आहे?

रोनाल्डो सध्या साऊदीच्या प्रो लीगमध्ये अल -नस्त्र या फुटबॉल क्लबकडून खेळतोय. मिळालेल्या माहितीनुसार तो प्रत्येक दिवशी जवळपास ४.८८ लाख युरो कमवतोय. शनिवारी एल फतेह सोबत झालेल्या सामन्यात त्यांच्या क्लबने ३-१ असा विजय मिळवला. मात्र रोनाल्डोला दुखापतीमुळं मैदान सोडावं लागलं होतं. दरम्यान, या भागातील वाढता लष्करी संघर्ष पाहून अल नस्रचा एशियन चॅम्पियन्स लीग टू क्वार्टर फायलन सामना देखील स्थगित करण्यात आला आहे.

खरंच रोनाल्डोने सौदी सोडलं?

जरी जेटचा फ्लाईट डेटा या गोष्टीकडे लक्ष वेधत असला तरी रोनाल्डो स्वतः सौदी सोडून बाहेर पडला आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. अनेकवेळा खेळाडू आपले वैयक्तिक विमान हे कुटुंबासाठी किंवा इतर कारणासाठी वापरतात. आता रोनाल्डोने जर सौदी सोडलं असेल तर त्याने सौदी कायमचंच सोडलं आहे की फक्त सुरक्षेच्या कारणास्तव काही काळासाठी सौदी सोडलं आहे हे मात्र अधिकृतरित्या स्पष्ट झालेलं नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT