Cristiano Ronaldo
दिल्ली : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्ज लग्न कधी करणार, हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडत असे. यावर दोघांनीही अनेकदा मनमोकळेपणाने उत्तरे दिली होती. रोनाल्डो आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ५ मुलांचा बाप असलेल्या रोनाल्डोची पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्जने इंस्टाग्रामवर एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे इंटरनेटवर धुमाकूळ उडाला आहे.
पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार रोनाल्डो आणि मॉडेल जॉर्जिना रोड्रिग्स यांची भेट २०१६ मध्ये माद्रिदमधील एका गुच्ची स्टोअरमध्ये झाली होती. तेव्हापासून त्यांनी एक सुंदर कुटुंब तयार केले आहे. जॉर्जिनासोबत रोनाल्डोला चार मुले आहेत. २०१७ मध्ये सरोगसीद्वारे ईव्हा मारिया आणि माटेओचा जन्म झाला. त्याच वर्षी अलाना जन्माला आली. २०२२ मध्ये बेला जन्माला आली, मात्र तिच्यासोबत जन्मलेल्या मुलाचा जन्मानंतर लगेच मृत्यू झाला. याशिवाय रोनाल्डोला रोनाल्डो ज्युनियर नावाचा मोठा मुलगाही आहे.
जॉर्जिनाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यात ती आणि रोनाल्डो हातात हात धरून दिसत आहेत. तिच्या हातात साखरपुड्याची अंगठी आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले “हो, मी मान्य केले आहे.” हा फोटो सौदी अरेबियातील रियाध येथील असल्याचे लोकेशनसह तिने शेअर केले. पोस्टनंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला.
२०२५ मध्ये रोनाल्डोची नेटवर्थ तब्बल १.४५ अब्ज डॉलर्स आहे. त्यांचा बेस पगार सुमारे २० कोटी डॉलर्स आहे. जाहिरातींमधून दरवर्षी अंदाजे १५ कोटी डॉलर्स कमवतो. २०२२ मध्ये त्यांने सौदी टीमसोबत ६० कोटी डॉलर्सचा करार केला होता, जो २०२७ पर्यंत वाढवण्यात आला आहे. क्लबने त्याच्यासोबत २ वर्षांसाठी सुमारे ६२ कोटी डॉलर्समध्ये नवा करार केला आहे.