Cristiano Ronaldo Al Nassr new contract Rs 2000 crore salary private jet bonuses ownership of club contract extension Saudi Pro League 2025 Highest paid footballer 2025
रियाध : जगप्रसिद्ध पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने सौदी प्रो लीगमधील अल-नासर क्लबसोबत आपला करार 2027 पर्यंत वाढवला असून, तो आता दरवर्षी तब्ब 2000 कोटी रुपये (सुमारे £178 दशलक्ष) इतकी भव्य कमाई करणार आहे. या दोन वर्षांच्या नवीन करारात अनेक आकर्षक बाबींचा समावेश आहे.
या कराराद्वारे रोनाल्डोला सायनिंग बोनस, प्रायव्हेट जेटचा खर्च, बोनस रक्कम आणि क्लबमधील मालकी हिस्सा असे लाभ मिळणार आहेत. या ऐतिहासिक करारामुळे रोनाल्डो जगातील हायस्ट पेड फुटबॉलर ठरला आहे.
वार्षिक पगार: £178 दशलक्ष (सुमारे ₹2000 कोटी)
सायनिंग बोनस: प्रथम वर्षासाठी £24.5 दशलक्ष, दुसऱ्या वर्षी £38 दशलक्ष
सौदी लीग जिंकल्यास बोनस: £8 दशलक्ष
एशियन चॅम्पियन्स लीग जिंकल्यास बोनस: £5 दशलक्ष
गोल्डन बूट (सर्वोच्च गोलस्कोरर) जिंकल्यास बोनस: £4 दशलक्ष
प्रत्येक गोलसाठी बोनस: £80,000 (दुसऱ्या वर्षी 20 टक्के वाढ)
प्रत्येक असिस्टसाठी बोनस: £40,000 (दुसऱ्या वर्षी 20 टक्के वाढ)
अल-नसर क्लबमध्ये 15 टक्के मालकी हिस्सा: सुमारे £ 33 दशलक्ष मूल्य
प्रायव्हेट जेटचा खर्च: £ 4 दशलक्ष क्लबकडून दिला जाणार
प्रायोजक करारांमधून अतिरिक्त: £60 दशलक्षची कमाई अपेक्षित
26 जून 2025 रोजी रोनाल्डोने नवीन दोन वर्षांचा करार केला आहे. त्यामुळे तो आता 2027 पर्यंत अल-नासरकडे खेळणार आहे. तो या कराराच्या शेवटी 42 वर्षांचा असणार आहे, तरीही अद्याप फॉरवर्ड खेळाडू म्हणून मैदानावर उतरणार आहे.
2023 पासून आतापर्यंत अल-नासरकडून 105 सामन्यांत 93 गोल केले आहेत. 2023-24 आणि 2024-25 या सलग दोन हंगामांमध्ये सौदी प्रो लीगचा टॉप स्कोरर राहिला आहे. मागील हंगामात त्याने 25 गोल केले आहेत. दरम्यान, नुकतेच पोर्तुगालसाठी UEFA नेशन्स लीग जिंकण्यातही त्याने मोलाची भूमिका बजावली होती.
रोनाल्डोने 2023 मध्ये अल-नसरसोबत करार केला होता. गेल्या दोन हंगामांमध्ये त्याने सौदी प्रो लीगमध्ये सर्वाधिक गोल केले असले, तरी क्लबला अजूनही लीग टायटल मिळवता आलेले नाही. यावर्षीही अल-नासर क्लब तिसऱ्या स्थानी राहिला आणि त्यांना FIFA क्लब वर्ल्ड कपमध्येही स्थान मिळाले नाही.
गेल्या महिन्यात रोनाल्डोने "This chapter is over" असे म्हणत सौदीतील त्याच्या कारकीर्दीच्या समाप्तीचा संकेत दिला होता. मात्र आता, करार वाढवून त्याने पुन्हा सौदी लीगमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.
PIF हा सौदी अरबचा सार्वजनिक संपत्ती निधी असून, अल-नासर, अल-हिलाल, अल-अहली यांसारख्या क्लब्सवर त्यांचे नियंत्रण आहे. त्यांनी या करारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एका PIF अधिकाऱ्याने सांगितले, "रोनाल्डोची उपस्थिती ही सौदी लीगच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि युवा प्रतिभा येथे खेचले जात आहेत."
क्रिस्टियानो रोनाल्डोचा जन्म 5 फेब्रुवारी 1985 रोजी झाला. आजच्या (27 जून 2025) तारखेनुसार त्याचे वय 40 वर्षे आहे. रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डोची नेटवर्थ अंदाजे $600–800 दशलक्ष आहे. काही स्त्रोतांनी $600 मिलियन (2025 मध्ये) अशी माहिती दिली आहे म्हणजे 49,800 कोटी रूपयांहून अधिक
रोनाल्डो वैधरित्या विवाहित नसला तरी त्याची पार्टनर मॉडेल जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत तो 8 वर्षांपासून एकत्र राहत आहे. जॉर्जिना 31 वर्षांची आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डोला एकूण 5 मुले आहेत. पैकी क्रिस्तियानो रोनाल्डो ज्युनियर याचा जन्म 17 जून 2010, युनायटेड स्टेट्स मध्ये झाला त्याच्या आईची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. तसे इव्हा मारिया डोस सांतोस आणि माटेओ रोनाल्डो ही दोन जुळी मुले सरोगसीद्वारे झाली आहेत.
त्यांच्या आईची ओळख उघड केलेली नाही. तर जॉर्जिना रॉड्रिग्जद्वारे त्याला अलाना मार्टिना आणि सांतोस एव्हेरियो ही मुले आहेत.