पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची ताजी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (दि.२०) हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. अंतिम निर्णय देण्यासाठी वांद्रे कुटुंब न्यायालयाला निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाने ६ महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी देखील माफ केला आहे. यासाठी दोघांनीही परस्पर संमतीने याचिका दाखल केली होती. नियमांनुसार, घटस्फोटासाठी परस्पर याचिका दाखल केल्यानंतर, समेट आणि पुनर्मिलनासाठी सहा महिन्यांचा वेळ दिला जातो. परंतु जेव्हा अशी कोणतीही शक्यता दिसत नाही तेव्हा न्यायालय ती रद्द करू शकते. (yuzvendra chahal dhanashree verma divorce)
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी परस्पर संमतीने घटस्फाेटासाठी याचिका दाखल केली होती. नियमांनुसार, घटस्फोटासाठी परस्पर याचिका दाखल केल्यानंतर पुनर्मिलनासाठी सहा महिन्यांचा वेळ दिला जातो; परंतु जेव्हा अशी कोणतीही शक्यता दिसत नाही तेव्हा न्यायालय ती रद्द करू शकते.
आयपीएल २२ मार्चपासून सुरू होईल.युजवेंद्र चहल २५ मार्च रोजी पंजाब किंग्ज संघाकडून त्याचा पहिला सामना खेळेल. पुढील दोन महिने या स्पर्धेत व्यस्त राहील. चहलचा सहभाग लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाला घटस्फोटाच्या याचिकेवर २० मार्चपर्यंत अंतिम निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत.
'बार अँड बेंच'ने दिलेल्या वृत्तानुसार, चहल आणि धनश्री अडीच वर्षांपासून वेगळे राहत आहेत. जून २०२२ पासून ते वेगळे झाले आहेत. त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी कौटुंबिक न्यायालयात घटस्फाेटासाठी संयुक्त याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये परस्पर संमतीने घटस्फोट मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे चहल आणि धनश्री आता एकत्र नसल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे.
मीडिया रिपाेर्टनुसार,पोटगीबाबत दोघांमध्ये परस्पर करार झाला आहे. याअंतर्गत युजवेंद्र चहल धनश्री वर्माला ४.७५ कोटी रुपये देणार आहे. कुटुंब न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, त्याने यापैकी २.३७ कोटी रुपये त्याने आधीच भरले आहेत. उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, दोघांमधील करारानुसार घटस्फोटाच्या आदेशानंतरच पोटगीचा दुसरा हप्ता युजवेंद्र चहल याला धनश्री वर्माला द्यावा लागणार आहे.
चहल आणि धनश्रीचे लग्न 2020 मध्ये झाले होते. दोघांमधील नाते फक्त ५ वर्षांपूर्वी सुरू झाले होते. कोविड महामारीच्या काळात, नृत्य वर्गादरम्यान जवळीक वाढली आणि नंतर ते प्रेमात पडले. चहल आणि धनश्रीचे लग्न २२ डिसेंबर २०२० रोजी झाले. तथापि, हे नाते २ वर्षही टिकले नाही.