नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
डान्स शिकता शिकता क्लीन बोल्ड झालेला भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने मंगळवारी लग्नाची गाठ बांधली. #DhanaSaidYuz असा हॅशटॅग वापरत त्याने लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर चाहत्यांनी त्याच्या फोटोंवर लाईक्ससोबतच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
चहल आणि धनश्रीचा लग्नसोहळा गुरुग्रामच्या लेक रिसॉर्टमध्ये पार पडला. कोरोनाच्या नियमांमुळे (Covid-19 guidelines) मोजक्या आप्तमंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. युजवेंद्र चहलने स्वतः लग्नाचा एक कँडिड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. #DhanaSaidYuz असा हॅशटॅग वापरत त्याने हा फोटो शेअर केला आहे. तसेच धनश्रीनेदेखील काही फाेटाे शेअर केले आहेत. विशेष म्हणजे दाोघांनी कॅप्शन एकच दिली आहे.
धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबरपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. आता लग्नाचा फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.