स्पोर्ट्स

Andrew Symonds : इंग्लंडमध्ये जन्मलेला अँड्र्यू सायमंड्सची ऑस्ट्रेलियात पोहोचण्याची ‘फिल्मी स्टोरी’!

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स याचा आज कार अपघातात मृत्यू झाला. ४६ वर्षीय सायमंड्सने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी, १९८ वन डे आणि १४ टी-२० सामने खेळले. ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या सायमंड्सचा जन्म ९ जून १९७५ रोजी बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे झाला होता. सायमंड्सच्या पालकांपैकी एक आफ्रो-कॅरिबियन होते आणि दुसरे स्वीडिश वंशाचे असल्याचे मानले जाते.(Andrew Symonds)

 जन्‍मदात्‍या पालकांना कधीच भेटला नाही

अँड्र्यू सायमंड्स त्याचा जन्‍म इंग्‍लंडमध्‍ये झाला. अवघ्‍या अडीच  जन्मानंतरच त्‍याच्‍या पालकांनी  त्याला दत्तक देण्‍याचा निर्णय घेतला. त्याला केन आणि बार्बरा यांनी ३ महिन्यांच्या असताना दत्तक घेतले होते. यावर सायमंड्स म्हणाला होतो की, 'मी एक दत्तक मूल आहे, त्यामुळे मी माझ्या जन्म दिलेल्या पालकांना ओळखत नाही. मी त्यांना कधीच भेटलो नाही. जेव्हा मी सहा आठवड्यांचा होतो, तेव्हा माझे पालक क्लिनिकमध्ये आले आणि मुलाला दत्तक घेण्यासाठी अर्ज केला हाेता.(Andrew Symonds )

सायमंड्सच्या दत्तक प्रक्रियेबद्दल…

दत्तक प्रक्रियेबद्दल आईने सांगितलेल्या गोष्टी आठवून सायमंड्स म्हणाला हाेता की, 'मला आठवते की ,आईने मला आठवडाभरासाठी घरी नेल्याची गोष्ट सांगितली होती. माझे पालक मुलांना पाहण्यासाठी आले असता त्यांनी माझ्याबद्दल माहिती घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टर्सना माझ्याबद्दल विचारणा केली की, माझा स्वभाव कसा आहे, यावर ते म्हणाले की, 'तो एक देवदूत आहे'. यावर माझे पालक म्हणाले, आम्हाला या मुलाला दत्तक घ्यायचा आहे.त्यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि मी अँड्र्यू सायमंड्स झालो, केनेथ वॉल्टर सायमंड्स आणि बार्बरा यांनी सायमंड्सला आपल्‍या घरी मुलगा म्हणून नेले.

दत्तक घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाला गेला सायमंड्स

सायमंड्स दत्तक घेतल्यानंतर काही दिवसांनी तो ऑस्ट्रेलियाला आला. त्याच्या जन्मामुळे तो इंग्लंड किंवा वेस्ट इंडिजकडून संघांकडून खेळू शकला असता; परंतु ऑस्ट्रेलिया हा संघ नेहमीच पहिली आणि एकमेव निवड असेल, असे त्याने स्‍पष्‍ट केले. त्याला क्रिकेटबद्दलची माहिती त्याच्या वडिलांकडून मिळाली. ताे वडिलांबराेबरच पहिल्‍यांदा क्रिकेट खेळला. सायमंड्स म्हणाला होता की, माझे वडील क्रिकेटचे चाहते होते. शाळेपूर्वी, शाळा सुटल्यावर ते माझ्यासाठी गोलंदाजी करायचे, अशीही आठवण त्याने यावेळी सांगितली हाेती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT