Wimbledon Women's Singles Final 2024
विम्‍बल्‍डन टेनिस स्‍पर्धेतील महिला एकेरीच्‍या अंतिम सामन्‍यात चेक प्रजासत्ताकच्‍या बार्बोरा क्रेजिकोवाने बाजी मारली.  File photo
स्पोर्ट्स

स्‍वप्‍नपूर्ती..! विम्बल्डनची नवी 'क्वीन' बार्बोरा क्रेजिकोवा

पुढारी वृत्तसेवा

जगभरातील टेनिसप्रेमींचे लक्ष वेधलेल्‍या विम्‍बल्‍डन टेनिस स्‍पर्धेतील महिला एकेरीच्‍या अंतिम सामन्‍यात चेक प्रजासत्ताकच्‍या बार्बोरा क्रेजिकोवाने बाजी मारली. अत्‍यंत चुरशीच्‍या सामना ६-२, २-६,६-४ असा जिंकत विम्‍बल्‍डन ग्रँडस्लॅमवर आपली माेहर उमटवली. इटलीच्‍या जॅस्मिन पाओलिनीला उपविजतेपदावर समाधान मानावे लागले. विशेष म्‍हणजे जॅस्मिन आणि बार्बोरा या दोघींनी प्रथमच बिम्‍बल्‍डनच्‍या अंतिम फेरीत धडक मारली होती.

पहिल्‍या सेटमध्‍ये क्रिजिकोवाचे निर्विवाद वर्चस्व

क्रिजिकोवाने पहिल्‍याच सेटमधील पहिल्‍या गेममध्‍ये पाओलिनीची सर्व्हिस भेदत आघाडी घेतली. यानंतर आपली सर्व्हिस कायम राखत पहिल्‍या सेटमधील आपली आघाडी कायम ठेवली. पहिल्‍या सेटमध्‍ये सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत क्रिजिकोवाने निर्विवादीत वर्चस्व राखले. तिने पहिला सेट ६-२ असा आपल्‍या नावावर केला.

दुसर्‍या सेटच्‍या पाओलिनीने क्रिजिकोवाची सर्व्हिस भेदत पुनरागमन केले.

पाओलिनीचे दमदार पुनरागमन

दुसर्‍या सेटच्‍या पहिल्‍या गेममध्‍ये आपली पाओलिनीने आपली सर्व्हिस कायम राखली. यानंतर क्रिजिकोवाची सर्व्हिस भेदत 2-0 अशी आघाडी घेतली. यानंतर सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत आपली सर्व्हिस कायम राखत ४-१ अशी निर्णायक आघाडी घेतली. यानंतर दुसरा सेट २-६ असा आपल्‍या नावावर करत सामना बरोबरीत आणला.

तिसर्‍या सेटमध्ये क्रेजिकोवाचे वर्चस्‍व

सामना बराेबरीत आल्‍यानंतर तिसर्‍या सेटमध्‍ये क्रेजिकोवा आणि पाओलिनी यांनी उत्‍कृष्‍ट टेनिसचे खेळीचे प्रदर्शन करत आपली तीन सर्व्हिस कायम राखल्‍या. मात्र चाैथ्‍या गेममध्‍ये पाओलिनीच्‍या किरकाेळ चुकाना हेरत क्रेजिकोवाने तिची सर्व्हिस भेदत 4-3 अशी आघाडी घेतली. यानंतर आपली सर्व्हिस कायम राखत सर्व्हिस कायम 5-3 अशी आघाडी घेतली. यानंतर तिसरा सेट ६-४ असा जिंकत विम्‍बल्‍डन ग्रँडस्लॅमवर आपली माेहर उमटवली.

पाठीदुखीवर मात करत क्रेजिकोवा ठरली बिम्‍बल्‍डनची नवविजेती

चेक प्रजासत्ताकची बार्बोरा क्रेजिकोवा ही स्‍पर्धेपूर्वी पाठदुखीला सामोरे जावे लागले होते. यंदाच्‍या बिम्‍बल्‍डन स्‍पर्धेत ती सहभागी होणार का याबाबत अश्‍चितता होती. मात्र तिने पाठदुखीवर मात करत थेट अंतिम फेरीत धडक मारली होती. क्रेजिकोवाने एलिना रायबाकिनाचा ३-६, ६-३, ६-४ असा पराभव करत यंदाच्‍या बिम्‍बल्‍डन स्‍पर्धेतील उपांत्य फेरीत धडक मारली होती.

ग्रँडस्लॅम विजयाचा अनुभव ठरला भारी

विशेष म्‍हणजे इटलीच्‍या जॅस्मिन पाओलिनी आणि चेक प्रजासत्ताकच्‍या बार्बोरा क्रेजिकोवा या दोघींनी प्रथमच बिम्‍बल्‍डनच्‍या अंतिम फेरीत धडक मारली होती. दोघेचेही वय २८ वर्ष आहे. मात्र बार्बोरा क्रेजिकोवा हिच्‍या नावावर एक ग्रँडस्लॅम होते. तिने तिने २०२१ मध्‍ये फ्रेंच ओपन स्‍पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. या अनुभवाचा फायदा तिला आजच्‍या अंतिम सामन्‍यात झाला. क्रेजिकोवााने उपात्‍य फेरीत माजी विजेत्‍या एलिना रायबाकिनाला पराभूत करुन अंतिम फेरीत धडक मारली होती. तर सातव्या मानांकित इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीने संघर्षपूर्ण लढतीत क्रोएशियाच्या डोना वेकिचचा पराभव करत कारकीर्दीत प्रथमच विम्बल्डन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

क्रेजिकोवाचे दुसरे ग्रँडस्लॅम

बार्बोरा क्रेजिकोवा हिने वयाच्‍या सहाव्‍या रॅकेट हाती घेतली. २०१३ मध्‍ये ती ज्युनियर जागतिक क्रमवारीत 3 व्या क्रमांकावर होती. आतापर्यंत एक ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद आणि दहा प्रमुख दुहेरी विजेतेपदे जिंकली होती. क्रेजिकोवाने 2021 WTA फायनल्स आणि 2020 टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.आता तिने विम्बल्डन ग्रँडस्लॅमवर आपली मोहर उमटवली आहे.

पाओलिनीकडून उत्‍कृष्‍ट खेळाचे प्रदर्शन

अंतिम सामन्‍यात इटलीच्‍या जॅस्मिन पाओलिनी उत्‍कृष्‍ट टेनिसचे प्रदर्शन केले. पहिल्‍या सेट गमावल्‍याने बॅकफूटवर गेलेल्‍या पाओलिनीने दुसर्‍या सेटमध्‍ये दमदार कमबॅक केले. मात्र तिसर्‍या सेटमध्‍येही पाओलिनी सरस ठरताना दिसत हाेती. मात्र चाैथ्‍या गेममध्‍ये पाओलिनीच्‍या किरकाेळ चुकाना हेरत क्रेजिकोवाने तिची सर्व्हिस भेदत 4-3 अशी आघाडी घेतली. एकुणच अंतिम सामन्‍यात बार्बोरा क्रेजिकोवाच्‍या विजयाबराेबरच पाओलिनीच्‍या झुंझार खेळाला टेनिसप्रेमींनी भरभरुन दाद दिली. ती सध्याची इटालियन नंबर 1 महिला खेळाडू आहे. यंदाच्‍या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पाओलिनीने संघर्षपूर्ण लढतीत क्रोएशियाच्या डोना वेकिचचा पराभव करत कारकीर्दीत प्रथमच विम्बल्डन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य लढतीत पाओलिनीने वेकिचवर २-६, ६-४, ७-६ (१०-८) असा विजय मिळवला होता. २०१६ नंतर एकाच हंगामात फ्रेंच आणि विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती पहिलीच महिला टेनिसपटू ठरली होती.

SCROLL FOR NEXT