Ban On IPL Telecast: बीसीसीआयच्या निर्देशानंतर कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रेहमान याला रिलीज केल्यानं बांगलादेश सरकारला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. बांगलादेश सरकारनं इंडियन प्रीमियर लीगचे प्रक्षेपणावर अनिश्चित काळासाठी बंदी आणली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश संबंधित प्रशासनानं काढला आहे. त्यात आयपीएल संबंधातील सर्व प्रक्षेपणांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे.
अधिकृत आदेशात म्हटलं आहे की, 'आयपीएल संदर्भातील सर्व प्रक्षेपण, प्रमोशन आणि इव्हेंट कव्हरेजवर तात्काळ प्रभावानं बंदी घालण्यात येत आहे. हे आदेश पुढची सूचना येईपर्यंत लागू राहतील. याबाबतचे निर्णय संबंधित प्रशासनानं लोकांच्या हितासाठी घेतला आहे.
नुकतेच कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजूर रेहमानला आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वीच रिलीज केल्यानंतर आला आहे. याबाबत बीसीसीआयने केकेआरला निर्देश दिले होते.
बांगलादेशने प्रसिद्ध केलेल्या आदेशात, 'बीसीसीआय क्रिकेट बोर्डानं घेतलेल्या निर्णयाचे कोणतेही तार्किक कारण नाहीये. या निर्णयामुळे बांगलादेशमधील लोकांना धक्का बसला असून अस्वस्थता आणि राग आहे. त्यामुळे प्रशासनाला आयपीएल प्रक्षेपणावर बंदी घालण्याचा निर्णय घेणं भाग पडल्याचं सांगण्यात आलं.