पाकिस्‍तानी फलंदाज बाबर आझम Pudhari photo
स्पोर्ट्स

Babar Azam : बाबर आझमने गाठला 'माईलस्टोन', दिग्गज फलंदाजांच्‍या यादीत मिळवले स्‍थान

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये 'अशी' कामगिरी करणारा ठरला केवळ पाचवा पाकिस्‍तानी

पुढारी वृत्तसेवा

Babar Azam in exclusive list

फैसलाबाद : पाकिस्‍तान क्रिकेट संघाच्‍या कर्णधारपदावरुन पायउतार झाल्‍यानंतरही स्‍टार फलंदाज बाबर आझमने नवा विक्रम आपल्‍या नावावर केला आहे. विशेष म्‍हणजे आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये 'अशी' कामगिरी करणारा ठरला केवळ पाचवा पाकिस्‍तानी क्रिकेटपटू ठरला आहे.

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये १५ हजार धावांचा टप्‍पा केला पूर्ण

फैसलाबाद येथील इक्बाल स्टेडियमवर शनिवारी (दि. ८) पाकिस्‍तानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामना झाला. या सामन्‍यात बाबरने ३२ चेंडूत २७ धावा केल्‍या; पण ११ व्‍या षटकामध्‍ये ब्योर्न फोर्टुइनविरुद्ध सैम अयुबसोबत तिसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. अत्‍यंत निराश होवून तो तंबूत परतला मात्र या २७ धावांची खेळीने त्‍याने १५,००० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्‍ये (कसोटी, वन-डे,T-20) धावांचा टप्‍पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पाचवा पाकिस्तानी फलंदाज ठरला आहे.

दिग्‍गज फलंदाजांच्‍या यादीत समावेश

विव्ह रिचर्ड्स (वेस्‍ट इंडिज), मोहम्मद अझरुद्दीन (भारत), अरविंदा डी सिल्वा (श्रीलंका),ॲलिस्टर कुक (इंग्‍लंड), ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्‍ट्रेलिया) यांच्‍यासह पाकिस्‍तानी फलंदाज इंझमाम-उल-हक, युनूस खान, मोहम्मद युसूफ आणि जावेद मियांदाद यांच्‍या यादीत आता बाबर आझम याचाही समावेश झाला आहे. त्‍याने ३२९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५.४६ च्या सरासरीने १५,००४ धावा केल्या आहेत. यामध्‍ये ३१ शतके आणि १०४ अर्धशतके यांचा समावेश आहे. त्‍याची सर्वोच्‍च धावसंख्‍या १९६ आहे. दरम्‍यान, आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक धावा या भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्‍या (३४ हजार ३५७) नावावर आहेत. विराट कोहलीच्‍या सध्‍या कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी वनडेमध्‍ये खेळत आहे. त्‍याने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये २७ हजारांपेक्षा अधिक धावा केल्‍या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT