पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात तगड्या स्पर्धकांना अविनाश साबळेने टक्कर दिली आणि फायनलमध्ये आपली जागा पक्की केली. Avinash Sable
स्पोर्ट्स

Avinash Sable : अविनाश साबळे अंतिम फेरीसाठी पात्र

3000 मीटर स्टीपलचेस प्रकार

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस |Avinash Sable : लक्ष्य सेन आणि निशा दहिया यांना पदकाने थोडक्यात हुलकावणी दिल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीयांचा सोमवारचा दिवस निराशाजनक राहिला होता. त्यामुळे मैदानी स्पर्धेत सर्वांच्या नजरा महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याच्याकडे लागल्या होत्या. पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात तगड्या स्पर्धकांना त्याने टक्कर दिली आणि फायनलमध्ये आपली जागा पक्की केली.

हिट-2 मध्ये अविनाश पळाला आणि त्याच्या गटात केनियाचा अब्राहम किविबोट, इथोपियाचा सॅम्युअल फिरेवू व जपानचा रियूजी मियुरा या जागतिक क्रमवारीत अव्वल 10 मध्ये असलेल्या खेळाडूंचे आव्हान होते. अविनाश जागतिक क्रमवारीत 15 व्या क्रमांकावर आहे आणि 8 मिनिटे 9.91 सेकंद ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ आहे. 3 हिटमधून प्रत्येकी 5 असे 15 खेळाडू फायनलसाठी पात्र ठरणार होते.

अविनाशने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती आणि अब्राहम व सॅम्युअल त्याच्या मागोमाग होते. पण, 1000 मीटर नंतर अविनाश तिसर्‍या क्रमांकावर ढकलला गेला. जपानच्या खेळाडूने अविनाशला आणखी एक स्थान मागे ढकलले. 2000 मीटर अंतर संपेपर्यंत अविनाशने पुन्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि दुसर्‍या स्थानावर येऊन पोहोचला. अब्राहम वारंवार मागे वळून जवळ येणार्‍या अविनाशकडे पाहत होता. मात्र, शेवटच्या लॅपची घंटा वाजली आणि अविनाश मागे पडला. पण, अविनाशने पाचव्या स्थानासह फायनलमधील आपली जागा पक्की केली. अविनाश 8 मिनिटे 15.43 सेकंदासह फायनलमध्ये पोहोचला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT