मुंबई | Vinod Kambli Health : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (vinod kambli condition) गेल्या काही काळापासून चुकीच्या कारणांसाठी चर्चेत येत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती बाईकपाशी उभा असलेला दिसत आहे, पण त्यावेळी त्याचा तोल जाताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या आजुबाजूला असलेल्या लोकांनी त्याला धीर दिल्याचे दिसत आहे. तो तोल जाणारा व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नसून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी असल्याचा कयास अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लावला आहे. अनेकांनी दारूच्या प्रभावामुळे कांबळीची ही अवस्था झाल्याचेही म्हटले आहे.
दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ असल्याने तो कांबळीच आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे तो कांबळीच असल्याची पुष्टी आम्ही करत नाही.