Arshdeep Singh Samreen Kaur Engagement Ring pudhari
स्पोर्ट्स

Arshdeep Singh Samreen Kaur Engagement Ring: १३८ वर्षापूर्वीचं डिझाईन... अर्शदीपनं समरीनला घातलेल्या खास डायमंड रिंगची किंमत किती?

अर्शदीपची होणारी पत्नी समरीनने इन्स्टाग्रामवर स्वप्नवत प्रपोजल असं म्हणत फोटो शेअर केले.

Anirudha Sankpal

Arshdeep Singh Samreen Kaur Engagement Ring: भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपली गर्लफ्रेंड समरीन कौरसोबतचं आपलं नात अजून पुढे नेलं आहे. त्याने ११ नोव्हेंबर रोजी अर्शदीप सिंग आणि समरीन कौरचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियावर याबाबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. दोघे रोमँटिक पोज देत आपली एंगेजमेंट रिंग दाखवली.

समरीनने इन्स्टाग्रामवर स्वप्नवत प्रपोजल असं म्हणत फोटो शेअर केले. यात समरीनने आपली खास डायमंड रिंग सर्वांना दाखवली. या रिंगकडे समान्यांपासून जाणकारांपर्यंत सर्वांचेच लक्ष गेले. त्यानंतर ही डायमंड रिंग किती खास आहे याची माहिती समोर आली आहे.

समरीनने फ्लॉन्ट केली डायमंड रिंग

समरीन कौरने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याला एक कॅप्शन दिलं. त्यात 'आयुष्य आपल्याला बरंच काही देत असते. मात्र सर्वात जास्त आनंद याचा आहे की या आयुष्याने आपल्याला एकमेकांची सोबत दिली आहे. आयुष्यभर एकत्र राहण्याची तारीख ११.११.२०२६.

विशेष म्हणजे सेलिब्रेटींच्या महागड्या अंगठ्या कायमच चर्चेचा विषय ठरतात. नुकतेच करीना कपूरचा एक हार चर्चेत आला आहे. मात्र समरीनची रिंग ही त्याच्या महागडेपणामुळे नाही तर साधेपणासाठी चर्चेत आली आहे. या अंगठीत हिरा एका खास अंदाजात जडण्यात आला आहे. हिरा हा अंगठीच्या जास्त वर दिसत आहे. या डिझाईनला प्रॉन्ग सेटिंग म्हणतात.

प्राँग सेटिंग काय असतं?

प्रॉन्ग सेटिंगमध्ये हिरा छोट्या छोट्या धातूच्या पंजाच्या शेपमध्ये मजबुतीने पकडलेला असतो. ही अंगठी प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड टिफनी अँड कोची आहे. अंगठीच्या मधोमध सिंगल राऊंड ब्रिलियंट कट डायमंड आहे. या रिंगची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे याचे सॉलिटेयर डिझाईन आहे. यामुळं आपलं संपूर्ण लक्ष हे फक्त सेंटर डायमंडवर टिकून राहतं.

या डायमंडची काय किंमत?

सेलिब्रिटी ज्वेलरी एक्सपर्ट पीयुष गोयल यांनी अर्शदीप सिंगने समरीन कौरला घातलेल्या अंगठीची किंमत किती असेल याचा अंदाज वर्तवला आहे. अमेरिकेत साईज ६ च्या प्लॅटिनम आणि हिरे जडीत ही साखरपुड्याची अंगठीची किंमत जवळापस ५९,००० डॉलर अर्थात ५५.२६ लाख रूपये असू शकते.

भारतात कॅरेटच्या हिशाबाने याचे फार कमी ऑप्शन मिळतात. ही एक १.६९ कॅरेटची अंगठी जवळपास ४४ लाख रूपये तर २.१० कॅरेटची अंगटी ही ६६.७९ लाख रूपयांची मिळते.

सॉलिटेयर डिझाईनचे वैशिष्ट्य

हे एक क्लासिक डिझाईन असून लग्जुरी ज्वेलरी ब्रँड टिफनी अँड कंपनीने १८८६ मध्ये हे डिझाईन सादर केलं होतं. यात हिरा हा अंगठीच्या बँडपेक्षा थोड्या वरच्या बाजूला उचलेला असतो. यामुळे हिऱ्याचा प्रकाश जास्त प्रमाणात पडतो. त्याची चमक, सौंदर्य अजूनच उठून दिसतं. यात सहा प्रॉन्ग्स हिऱ्याला मजबतूने आपल्या जागी ठेवतात. हे डिझाईन १३८ वर्षे जुने असूनही आज देखील एंगेजमेंटसाठी ही अंगठी फेव्हरेट क्लासिक स्टाईलमध्ये सामील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT