विश्‍व'विजेत्‍या टीम इंडियाच्‍या संगीतकार रेहमान यांनी एक खास भेट दिली आहे.  Twitter
स्पोर्ट्स

T20 World Cup 2024|'विश्‍व'विजेत्‍या टीम इंडियाला संगीतकार रेहमान यांनी दिली खास भेट

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत विश्‍वचषकावर आपलं नाव कोरलं. तब्‍बल ११ वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्‍काळ संपवला. या ऐतिहासिक विजयाने जगविख्‍यात भारतीय संगीतकार ए.आर रेहमान ही भारावले आहेत. 'विश्‍व'विजेत्‍या टीम इंडियाच्‍या संगीतकार रेहमान यांनी एक खास भेट दिली आहे.

ए आर रहमान यांची टीम इंडियाला खास भेट

टी-20 विश्वचषक 2024 च्‍या अंतिम सामन्‍यात राेहित शर्माच्‍या नेतृत्त्‍वाखालील भारत संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. या विजयाने भारावलेले ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार, एआर रहमान यांनी टीम इंडियाला एक खास गाणे भेट केले आहे. हा व्हिडिओ संगीतकार ए. आर. रेहमान यांनी त्यांच्या 'X' अकाऊंटवरून शेअर केला आहे.

'टीम इंडिया है हम'; एआर रहमान यांचे गीत

अभिनेता अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटातील 'टीम इंडिया है हम' या शीर्षकाचे गाणे एआर रहमान यांनी संगीतबद्ध, निर्मित आणि सादर केलेले आहे. हे मूळ गीत ए आर रहमान आणि नकुल अभ्यंकर यांनी गायले आहे. 'मैदान' हा चित्रपट भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे.

आमच्या कामगिरीचा आनंद घ्या- एआर रेहमानची X पोस्ट

टीम इंडियाच्या टी-२० विजयानंतर रविवार ३० जून रोजी एआर रहमान यांनी 'टीम इंडिया है हम' या म्युझिक व्हिडिओची यूट्यूब लिंक शेअर केली. त्यांनी लिहिले आहे की , "भारताचा #T20IWorldCup विजय साजरा करत आहे. आमच्या #TeamIndia गाण्याच्या कामगिरीचा (sic) आनंद घ्या."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT