IPL 2026 KKR pudhari
स्पोर्ट्स

IPL 2026 KKR : 6,6,6,6,6... केकेआरमध्ये 'रघु'राज! आयपीएलपूर्वीच शतक ठोकत माहोल केला सेट; मॅनेजमेंटला संदेश थेट

Anirudha Sankpal

IPL 2026 KKR Angkrish Raghuvanshi: आयपीएल २०२६ चा महासंग्राम रंगण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा युवा खेळाडू अंगकृष रघुवंशीने माहोलच सेट केला. त्याने ५५ चेंडूत शतक ठोकत केकेआरमधील प्लेईंग ११ मधील आपला जागा फिक्स करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या या खेळीत तब्बल ९ चौकार तर ५ षटकार ठोकले. अंगकृषने ही खेळी पर्पल नाईट्स विरूद्ध गोल्डन नाईट्स या सामन्यात केली.

आयपीएलपूर्वीच मोठा धमाका

आयपीएल हंगामाला सामोरे जाण्यापूर्वी केकेआरने इंटर स्क्वाड सराव सामना खेळला. हा सामना पर्पल नाईट्स आणि गोल्डन नाईट्स असा झाला. प्रथम फलंदाजी करताना गोल्डन नाईट्सने आक्रमक सुरूवात केली. टीम सीफर्ट आणि सार्थक रंजन यांनी धडाकेबात सुरूवात करून दिली. सीफर्टने १३ चेंडूत ३० धावा तर सार्थकने १६ चेंडूत ३७ धावा केल्या. मात्र आक्रमक सुरूवात करण्याच्या नादात टीमने १० षटकातच ३ विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळं नंतर त्याचा परिणाम धावगतीवर झाला.

हाय व्होल्टेज सराव

मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंहने ४० धावा आणि अनुकूल रॉयने चांगली फलंदाजी करत संघाला २० षटकात ८ बाद १९९ धावांपर्यंत मजल मारली. पर्पल नाईट्सकडून वैभव अरोरा आणि कार्तिक त्यागीने चांगला मारा केला.

दरम्यान, २०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पर्पल नाईट्सची सुरूवात खराब झाली. अजिंक्य रहाणे दुसऱ्याच षटकात बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या अंगकृष रघुवंशीने सामन्याचे चित्रच पालटलं. त्यानं सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली.

जय्यत तयारी

रघुवंशीने आक्रमक फलंदाजी करत ५५ चेंडूत नाबाद १०३ धावा ठोकल्या. यात ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. रघुवंशीपाठोपाठ फिन एलनने २३ तर अनुकूल रॉयने नाबाद २८ धावा केल्या. पर्पल नाईट्सने १९.२ षटकात ४ बाद २०३ धावा करत सामना सहा विकेट्स राखून जिंकला. केकेआरच्या कळपातील पहिलाच सराव सामना हाय स्कोरिंग आणि उत्कंठावर्धक झाला. यामुळं केकेआरची आयपीएलची जय्यत तयारी सुरू आहे हे अधोरेखित होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT