Ajinkya Rahane Video pudhari
स्पोर्ट्स

Ajinkya Rahane Video: ते माझ्यावर जळतात, अजेंडा राबवतात... सामन्यानंतर पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणे जाम भडकला

Anirudha Sankpal

Ajinkya Rahane Video : आयपीएल २०२६ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या पराभवामुळं कर्णधार अजिंक्य रहाणेवर दबाव वाढत चालला आहे. याची प्रचिती सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत आली. रहाणे हा एका पत्रकाराच्या प्रश्नावर जाम चिडलेला दिसला.

अजेंडा राबवतात

राहणेने सनराईजर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात १० चेंडूत ८ धावा केल्या. यानंतर त्याला त्याच्या स्ट्राईक रेटबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्याला तो आवडला नसल्याचं दिसून आलं.त्याने २०२३ पासून माझा स्ट्राईक रेट हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट्सपैकी एक आहे असे सांगत माझ्याविरूद्ध लोकं अजेंडा चालवत आहेत असा दावा केला.

अजिंक्य रहाणे म्हणाला की, 'मला वाटतं की माझा स्ट्राईक रेट हा २०२३ पासूनच्या सर्वोत्त स्ट्राईक रेट असलेल्यापैकी एक आहे. जे माझ्याबाबत बोलत आहेत ते शक्यतो सामना पाहत नाहीयेत किंवा ते माझ्याविरूद्ध एक विशिष्ट अजेंडा राबवत आहेत. त्यांना मी खेळताना पाहणं आवडत नाही.'

ते माझ्यावर जळतात

कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला आयपीएल २०२५ च्या हंगामात आपल्या संघाचा कर्णधार केलं होतं. त्याने गेल्या हंगामात ३९० धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याचे स्ट्राईक रेट हे १४७.७३ इतके होते. मात्र असं असलं तरी अजिंक्य रहाणेला त्याच्या संघाला प्लेऑफ मध्ये घेऊन जाता आलं नव्हतं.

दरम्याान, रहाणेने त्याच्या खेळण्याच्या स्टाईलवर बोलणाऱ्यांबद्दल ते माझ्यावर जळतात असं देखील वक्तव्य केलं. रहाणे म्हणाला, 'ज्या प्रकारचे यश मला मिळाले आहे मला वाटते की ते माझ्यावर जळतात. मी याची अजिबात काळजी करत नाही. तुम्हा लोकांना माहिती आहे की मी काय करतो.'

माझी पद्धत प्रत्येकाला आवडेल असं नाही

'फक्त एक खराब इनिंग ही काही खराब कामगिरी नसते. माझे इंटेट काय होते तेही पाहा. कधी कधी फलंदाज म्हणून तुम्हाला तो रिदम मिळत नाही. जे माझ्याबाबत बोलत आहेत त्यांना खेळाबद्दल काही ज्ञान नाही किंवा त्यांना मी वेगळ्याच प्रकारची इनिंग खेळावी असं वाटतं.' रहाणे पुढे म्हणाला, माझी खेळण्याची पद्धत प्रत्येकाला आवडेल असं नाही. मात्र मी यशस्वी ठरतोय.

अजिंक्य रहाणेने टी २० क्रिकेटमध्ये आपल्या गेमवर काम केलं आहे. त्याने २०२३ च्या हंगामात सीएसकेकडून खेळताना १७२.४९ च्या स्ट्राईक रेटने ३२६ धावा ठोकल्या होत्या. २०२४ मध्ये त्याने १२३.४७ च्या सरासरीने २४२ धावा केल्या. यानंतर सीएसकेने त्याला रिलीज केलं. आता तो २०२५ पासून केकेआरमध्ये खेळतोय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT