स्पोर्ट्स

4,4,2,6,4,6 : किरॉन पोलार्ड याच्यापुढे आंद्रे रसेलने टेकले गुडघे

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सध्या संयुक्त अरब अमिरातीत आंतरराष्ट्रीय लीग टी-20 लीग खेळली जात असून स्पर्धेतील 26 वा सामना एमआय एमिरेटस् विरुद्ध अबुधाबी नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यादरम्यान किरॉन पोलार्ड आणि आंद्रे रसेल आमने-सामने आले होते. त्यावेळी पोलार्डने एकाच षटकात आपल्या देशबांधवाच्या गोलंदाजीच्या ठिकर्‍या उडवल्या. त्याने रसेलच्या एकाच षटकात 26 धावा कुटून चाहत्यांचे मनोरंजन केले.

पोलार्डने त्या षटकात 4,4,2,4,6 अशा एकूण 26 धावा चोपल्या. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या सामन्यात पोलार्डच्या एमआय एमिरेटस्ने अबुधाबी नाईट रायडर्सवर 18 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. या लढतीत किरॉन पोलार्ड याने केवळ 17 चेंडूंत 43 धावा फटकावल्या. त्यामुळे त्यालाच सामनावीर पुरस्कार मिळाला.

पहिल्या तीन चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्यानंतर, रसेलने धिम्या गतीने चेंडू टाकला आणि पोलार्डने चेंडू प्रेक्षकांत भिरकावला. पाचव्या चेंडूवर पोलार्डने थर्ड मॅनच्या दिशेने चौकार लगावला. निराश होऊन रसेल शेवटचा चेंडू यॉर्कर टाकायला गेला, पण तो चुकला. पोलार्डला फुलटॉस मिळाला आणि लाँग ऑनवर त्याने षटकार खेचला.

हेही वाचा…

SCROLL FOR NEXT