Mahesh Babu-Namrata 
Latest

Mahesh Babu-Namrata : महेश बाबू पत्नी नम्रतासोबत रोमाँटिक; खास पोस्टमध्ये लिहिलंय…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार महेश बाबू यांनी त्यांची पत्नी नम्रता शिरोडकर ( Mahesh Babu-Namrata ) सोबत खास पद्धतीने यंदाच्या नवीन वर्षाचे सेलेब्रेशन केले आहे. कुटुंबासोबत नववर्षाचे स्वागत करताना महेश बाबू पत्नीसोबत रोमाँटिक मूडमध्ये दिसले आहेत. नुकताच त्याचा पत्नी नम्रतासोबतचा रोमाँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर झाला आहे.

संबंधित बातम्या 

नुकतेच सुपरस्टार महेश बाबू यांनी पत्नी नम्रता शिरोडकरसोबतचा ( Mahesh Babu-Namrata ) त्याच्या इंन्स्टाग्रामवर एक रोमाँटिक फोटो शेअर केलाय. यावेळी महेश बाबूंनी त्याच्या कुंटूबियांसोबत नविन वर्षाचे स्वागत अनोख्या आणि खास पद्धतीने सेलेब्रेशन केलं आहे. महेश बांबूनी नम्रताला नविन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या रोमँटिक फोटोत महेश बांबूनी नम्रताच्या गालावर किस करतानाही दिसत आहेत. यावेळी महेश बाबू आकाशी कलरच्या टिशर्ट आणि डेमिनमध्ये तर नम्रता ब्लॅक कलरच्या टिशर्ट- डेनिममध्ये दिसली. हे दोघेजण क्यूट कपल त्याच्या घरातील सोप्यावर बसलेली दिसत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत महेश बाबूंनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'उत्स्फूर्तता, हास्य, प्रेम, साहस, वाढ, नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२४ ❤️.' याशिवाय महेश बाबूंनी कुटूबिय आणि मित्रमंडळीसोबत मनसोक्त जेवणावर तावही मारला आहे. याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह मराठी अभिनेत्री सायली संजीवने दोघांचे भरभरून कौतुक करताना कॉमेन्टस केल्या आहेत. '

Adorable ??', 'Ahhha Anna?❤️', 'Happppppppppy happppppppppy new year Mahesh❤️', 'love you so much mahi ❤️❤️', 'Aww ???', 'Happy new year bangaram…?❤️', 'Cutest couple ?', 'Cute ?', '❤️ adorable pic', 'Happy new year???may those smiles always remain that way touchwood ??'. यासारख्या अनेक कॉमेन्ट या फोटोवर पाहायला मिळाल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केलेत. या फोटोला आतापर्यत ११ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT