Sarath Babu 
Latest

Sarath Babu : प्रसिद्ध अभिनेते सरथ बाबू व्हेंटिलेटरवर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ प्रसिद्ध अभिनेता सरथ बाबू ( Sarath Babu ) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सरथ यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखाली उपचार सुरु असून त्यांना रविवारी दुपारी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ७१ वर्षीय दिग्गज अभिनेते सरथ बाबू सेप्सिस नावाच्या आजारांशी झुंज देत आहे. याबाबतची माहिती चाहत्यांना मिळताच ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून सरथ बाबू ( Sarath Babu ) हे सेप्सिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत. या आजाराचा परिणाम शरीराच्या मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत आणि इतर अवयवांवर होत असतो. गेल्या २० एप्रिल रोजी त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना बेंगळुरूहून हैदराबादला आणण्यात आले आणि एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.

सरथ बाबू यांना आठवड्यात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी त्याना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे बोलले जात आहे. या बाबतची माहिती चाहत्यांना मिळताच त्यांनी ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत.

सरथ बाबू यांचे पूर्ण नाव सत्यम बाबू दिक्षितुलु असे आहे. १९७३ मध्ये त्यांनी 'राम राज्यम' या तेलुगू चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. १९७७ मध्ये त्यांनी बालचंद्र यांच्या 'पत्तीना प्रवेशम' या चित्रपटातून तमिळ चित्रपटांमध्ये एन्ट्री केली. २०२१ मध्ये ते पवन कल्याण सोबतच्या 'वकील साब' आणि २०२३ मध्ये शेवटचे 'वसंता मुल्लाई' चित्रपटामध्ये दिसले आहेत. सरथ यांनी २३० हून अधिक तामिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना ९ वेळा नंदी पुरस्कारने सम्मानित केले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT