Ram Charan 
Latest

Ram Charan : राम चरण तिरुपतीच्या दर्शनाला; कन्येला पदराआड लपवताना दिसली उपासना

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता राम चरणचा ( Ram Charan ) आज दि. २७ मार्च रोजी ३९ वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने राम चरण आणि त्याची पत्नी उपासना आणि मुलगी क्लिन कारासोबत आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात भेट दिली आहे. बालाजी मंदिरात भेट देवून त्यांनी पूजा- अर्चा करून देवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी राम चरणच्या चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

संबंधित बातम्या 

तिरुपती मंदिरात प्रवेश करतानाचा अभिनेता राम चरणचा ( Ram Charan ) हा व्हिडिओ एक्स (x) टविटर व्हायरल झाला आहे. यावेळी राम चरणने शर्ट आणि वेस्टी परिधान केले होते. तर पत्नी उपासनाने पिंक रंगाची साडी परिधान केली आहे. मात्र, तिने तिच्या साडीच्या पदराने मुलगी क्लीनचा चेहरा लपविल्या व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान तिरुपती बालाजी मंदिरातून बाहेर पडताना राम चरण पॉपराझीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. यावेळी त्याने फोटो न काढण्याची विनंती केली. मात्र, त्याचा व्हिडिओ काढण्यात आला. दरम्यान राम चरणला पाहण्यासाठी चाहत्यांनी खुपच गर्दी केली.

राम चरणचा 'गेम चेंजर' सप्टेंबर २०२४ मध्ये रिलीज होणार

राम चरण यांनी त्यांच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्ताने तिरूपती बालाजीचे आशीर्वाद घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात केली. यावेळी ते प्रसन्न होते. दरम्यान सकाळपासून चाहते सोशल मीडियावर राम चरणला भरभरून शुभेच्छा देत आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, राम चरण आगामी 'गेम चेंजर' चित्रपटात दिसणार आहे. एस शंकर दिग्दर्शित हा चित्रपट सप्टेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राम चरणसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आहे. याशिवाय राम चरण 'पुष्पा' दिग्दर्शक सुकुमार यांच्या चित्रपटात दिसणार आहे. सध्या याला RC१५ असे नाव देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT