मुंबई; पुढारी ऑनलाईन : भारतीय क्रिकेट मधील दिग्गज आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार व सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा लेजंड लीग क्रिकेटचा ( legends league cricket) भाग बनणार आहे. लेजंड क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सत्रात तो खेळणार असल्याचे त्याने स्वत: स्पष्ट केले. या बाबत बोलताना सौरव गांगुली म्हणाला,' इतर दिग्गज खेळाडुंसोबत खेळताना खूप मजा येईल'.
[visual_portfolio id="266781"]
याबाबत बोलताना लेजंड्स क्रिकेट लीगचे सह-संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी रमन रहेजा म्हणाले, सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा मैदानात खेळताना पाहणे हे क्रीडा रसिकांसाठी खूप आंनददायी क्षण असेल. लीजेंड्स कुटुंबात आम्ही सौरव गागुंली यांचे स्वागत करतो. तसेच लेजंडस क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सत्रात गांगुलीला मैदानात चांगले प्रदर्शन करताना पाहणे हे आमच्यासाठी सुद्धा उत्सुकतेचे असणार आहे. या माध्यमातून आपल्याला दादाचे ते ट्रेडमार्क शॉट्स देखिल पहायला मिळतील यात शंका नाही.
कोलकाताचा प्रिन्स सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) पाहून अनेक तरुण खेळाडुंनी प्रेरणा घेऊन आपले करिअर घडवले आहे. अद्याप देखिल दादाची स्टाईल आणि त्याची क्रिकेट बाबत असेलेले प्रेम व वेड देखिल चाहत्यांना त्याचाकडे खेचून आणते. त्याला त्याच आवेशात पुन्हा मैदान पाहणे हे त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असेल. या आधी विरेंद्र सेहवाग, वाटसन, इयॉन मॉर्गन, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभन सिंग, माँटी पानेसर अशा प्रतिष्ठीत खेळाडूंनी लेजंड्स लीग ऑफ क्रिकेटच्या दुसऱ्या पर्वात खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.