पुढारी ऑनलाईन : वरुण धवनचा चित्रपट 'जुग जुग जियो' 24 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील 'नाच पंजाबन' हे गाणे आधीच हिट झालेले आहे आणि अनेक सेलिबि—टीही या गाण्यावर रील्स बनवत आहेत. आता सारा अली खाननेही एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती रणवीर सिंह आणि करण जोहर यांच्यासमवेत 'नाच पंजाबन' गाण्यावर ठुमके दाखवत असताना दिसते.
या गाण्याचे हे तिघेजण हुक स्टेप करीत असताना यामध्ये दिसून येतात. वरुणनेही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'सारा का सारा प्यार' असे त्याने म्हटले आहे! आता हा व्हिडीओ सोशल मीडियातही वेगाने व्हायरल होत आहे. 'नाच पंजाबन' गाणे रीलिज होताच वरुणने व्हिडीओ बनवून 'नाच पंजाबन चॅलेंज'ची सुरुवात केली होती.
हेही वाचलंत का?