छोट्या पडद्यावरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्मान केलं आहे. या मालिकेत नवरात्र स्पेशल भाग लवकरच दाखवण्यात येणार आहे. या मालिकेतील फुलपाखरु फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने चाहत्यांसोबत मालिकेच्या चित्रीकरणाचा एक भाग शेअर केला आहे. नवरात्र स्पेशिकल भाग चित्रित करण्यासाठी सगळ्यांनाच अथक मेहनत करायला लागल्याचा अनुभव देखील चाहत्यांसोबत तिने शेअर केला आहे.
ऋता हिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये नवरात्र स्पेशल भाग चित्रित करण्यासाठी घेण्यात आलेली मेहनत दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ऋताने लिहिलं आहे की, '३५ तासांचं चित्रीकरण हे असं असतं. वेगवेगळ्या शिफ्ट, मेकअप रूमची व्यवस्था नाही, अतिउत्साहीत लोक, पण शेवटी जेव्हा तुम्ही या सगळ्याचा परिणाम बघता तेव्हा तुम्ही तुमचा सगळा थकवा विसरून जाता.
काहीतरी सुंदर तयार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन मेहनत करणं गरजेचं आहे. मी लेखकांचे आभार मानते ज्यांनी हे उत्कृष्ट सीन लिहिले. यासोबतच कॅमेरामन आणि दिग्दर्शकाच्या मेहनतीला सलाम. आम्हाला सगळं साहित्य पुरवणाऱ्या निर्मात्यांच्या टीमला धन्यवाद.'
ऋता पुढे म्हणाली की, मी 'मन उडू उडू झालं' या मालिकेचा भाग असल्याचा मला अभिमान वाटत आहे. या मालिकेवर इतकं प्रचंड प्रेम केल्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार..' या नवरात्र विशेष भागात दिपू आणि अजिंक्य गरबा खेळताना दिसणार आहेत. नवरात्रच्या या विशेष भागासाठी प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादासाठी 'मन उडू उडू झालं' या मालिकेची संपूर्ण टीम उत्साहीत आहे.
झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ही मालिका अल्पावधीत त्यांची आवडती बनली असून, त्यातील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटू लागले आहेत. या मालिकेतील इंद्रा आणि दिपू यांनी अल्पावधीत या मालिकेत प्रक्षेकांना भुरळ पाडली आहे. इंद्रा आणि दिपूच्या जोडीवर आणि या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. पण त्याचसोबत या मालिकेच्या शीर्षक गीतावर देखील प्रेमाचा वर्षाव होतोय.
या मालिकेत इंद्राचं खरं नाव अजिंक्य राऊत असं आहे. ही त्यांची पहिलीच मालिका नाही. याआधी ही त्याने अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. अजिंक्यने कॉलेजचं शिक्षण पुण्यातील डी.वाय. पाटीलमध्ये केलं आहे. तर शालेय शिक्षण हे परभणीत पुर्ण झालं आहे. कोठारे व्हिजन निर्मित विठू माऊली या मालिकेतून त्याने स्मॉल स्क्रिनवर पदार्पण केलं आहे.