मनोरंजन

‘भाईजान’ मध्ये पलक तिवारी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : टीव्ही स्टार श्वेता तिवारीची कन्या पलक तिवारी हीला सलमान खानच्या 'भाईजान' मध्ये संधी मिळाली आहे. अलिकडेच मेकर्सनी या चित्रपटाचे 'कभी ईद कभी दिवाली' हे नाव बदलून ते 'भाईजान' केले होते. या चित्रपटा 'बिग बॉस-13' फेम शहनाज गिलही प्रमुख भुमिकेत आहे.

'भाईजान' साठी पलकला एक मोठी व महत्वाची भुमिका मिळाली आहे. ती या चित्रपटात पंजाबी गायक आणि अभिनेता जस्सी गिलबरोबर दिसून येईल. पलकने चित्रपटाचे शुटिंगही सुरू केले असल्याचे सांगण्यात येते. सुत्रांच्या माहितीनुसार खुद्द सलमाननेच पलकची या चित्रपटासाठी निवड केली आहे. चित्रपटात पलक आणि जस्सी यांचे एक गाणेही असेल. फरहाद समजी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात वेंकटेश, पूजा हेगडे यांच्याही प्रमुख भुमिका आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT