मनोरंजन

‘बैरागी का सूती चोला ओढके चली’ म्हणत सोनाली कुलकर्णीचा हटके लूक

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या नवनव्या फोटो शूटमुळे चर्चेत आली आहे. आता असेच आणखी एकदा 'बैरागी का सूती चोला ओढके चली' म्हणत सोनाली कुलकर्णी हटके फोटोशूट केले आहे.

सोनाली कुलकर्णीने काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत चाहत्यांना भूरळ घातली आहे. या फोटोत ती खूपच हॉट दिसत आहे. सोनालीने रंगीबेरंगी कपडे परिधान करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या देखण्या रुपात सोनालीचे सौंदर्य आणखी खुलले आहे.

सोनालीचा हटके फोटोशूट व्हायरल

सोनाली सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती नेहमी आपले हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. या फोटोला सोनालीने बैरागी, बैरागी का सूती चोला ओढके चली अशी हटके कॅप्शन दिली आहे.

सोनाली हे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर कॉमेन्टसचा पाऊस पडत आहे. तर एका युजर्सने या फोटोंवर कॉमेन्टस करत आगीचा ईमोजी शेअर केला आहे.

सोनाली गेल्या काही दिवसांपासून आपल्या पती कुणाल बेनोडेकरसोबत मालदिवमध्ये सुट्याचा आनंद एन्जॉय करत आहे.
तेथूनच ती आपल्या चाहत्यांसाठी हटके फोटोशूट करत असते. लग्नानंतर सोनालीच्या सौंदर्यात दिवसेंदिवस खुलत आहे.

याआधी सोनालीने जांभळ्या रंगाचा टॉप आणि निळ्या जिन्समध्ये पर्पल फोटोशूट केले होते. या पर्पल फोटोशूटपूर्वी सोनालीने वेस्टर्नमध्ये नथीचा नखरा दाखवला होता. #नथीचानखरा returns!अशी कॅप्शन देत सोनालीने खास फोटोशूट केले होते.

७ मे २०२१ रोजी दुबईत सोनालीचा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो तिने वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सोनालीच्या नव्या चित्रपटाची घोषणाही झाली असून २०२२ च्या नोव्हेंबर महिन्यात सोनालीचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या 'तमाशा लाइव्ह' या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'तमाशा लाइव्ह' संगीतमय चित्रपट असल्याने प्रेक्षकांचा त्याला कसा प्रतिसाद लाभतो हे पाहणं औसुक्याचं ठरेल.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT