मनोरंजन

नवी दिल्ली : पुष्पाची श्रीवल्‍ली बनली ग्लॅमरस

सोनाली जाधव

नवी दिल्ली : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आपल्या सौंदर्याच्या बळावर नॅशनल क्रश बनली आहे. पुष्पाची श्रीवल्ली बनल्याने तर तिच्या लोकप्रियतेने चांगलीच उसळी मारली. अशा या रश्मिकाच्या नवनव्या इमेजची चाहत्यांना प्रतीक्षा असते. त्यांना ही अभिनेत्री निराशही करत नाही. आपले वेगवेगळ्या अँगलचे फोटो ती शेअर करत चाहत्यांचे हृदय जिंकत असते. रश्मिकाने नुकतेच आपले एक छायाचित्र शेअर केले असून त्यामध्ये तिने आपल्या फिटनेसचे रहस्यही सांगितले आहे.

रश्मिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे छायाचित्र शेअर करताना म्हटले की मला माहीत नाही की, हे छायाचित्र शेअर करण्यास परवानगी आहे की नाही? कारण तुमच्यापैकी काही जण ते पसंद तर काहीजण नापसंद करतील. या फोटोसोबत मी स्टोरीही पोस्ट करत आहे. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी फिटनेसवर भर दिला पाहिजे. डाएट फॉलो करा आणि स्थिर राहून जीवनाचा आनंद लुटा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT