मनोरंजन

‘द ग्रेट इंडियन किचन’च्या हिंदी रिमेकमध्ये सान्या

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

अलीकडच्या काळात दाक्षिणात्य चित्रपट संपूर्ण भारतभरात पसंत केले जात आहेत. या चित्रपटांनी बॉलीवूडसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनने आता समीकरणच बनले आहे. याच रिमेकमध्ये आणखी एका चित्रपटाचे नाव सामील झाले आहे. मल्याळम सुपरहिट चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन'चा आता हिंदी रिमेक बनणार असून अभिनेत्री सान्या मल्होत्रा यात मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.

ती मूळ चित्रपटात निमिषा सजयन हिने साकारलेली भूमिका करणार आहे. अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. हरमन बावेजा आणि विक्की बहरी यांनी हिंदी रिमेकसाठी हक्क खरेदी केले आहेत. चित्रपटातील कलावंतांचा शोध आता सुरू झाला आहे. पटकथेवर काम सुरू झाले असून याच वर्षीपासून शूटिंग सुरू होऊ शकते. अनेक भारतीय महिलांच्या वाट्याला 'किचन' येतेच. त्यावरच हा चित्रपट आधारित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT