मनोरंजन

…आणि विल स्मिथने भडकावली कानशिलात!

अनुराधा कोरवी

लॉस एंजिल्स ः यंदा ऑस्करच्या मंचावर जे काही घडले ते अनपेक्षित आणि धक्‍कादायकच होते. सूत्रसंचालक ख्रिस रॉक याने मंचावरून विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्‍ली उडवली. त्याच्या या आचरटपणामुळे संतापलेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन ख्रिसच्या कानशिलात भडकावली.

त्यानंतर तो त्याच्या जागेवर येऊन म्हणाला, माझ्या पत्नीचे नाव तुझ्या घाणेरड्या तोंडातून घेऊ नकोस! सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा विल स्मिथ आणि सूत्रसंचालक ख्रिस रॉक यांच्यामधील या धक्‍कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला.

विलची पत्नी जेडा हिला एक असा आजार आहे ज्यामुळे तिचे केस गळतात. ख्रिस रॉकने एका चित्रपटातील टक्‍कल असलेल्या पात्राशी तिची तुलना केल्याने विल संतापला होता. ऑस्करच्या नियमानुसार विलला आपला पुरस्कार परत करावा लागू शकतो असे आता म्हटले जात आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT