Zubeen Garg Death :
प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात रोज मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. आता आसाम पोलीसांच्या विशेष तपास पथकानं झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात गर्गचा बँडमेट शेखर ज्योती गोस्वामी आणि सह गायिका अम्रितप्रवा महंता यांना अटक केली आहे. यामुळं आता या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या ही ४ वर पोहचली आहे. याबाबतचं वृत्त एनडीटीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
अटक झालेले गोस्वामी आण महंता हे १९ सप्टेंबर रोजी झालेल्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल दरम्यान गर्ग यांच्या यॉट पार्टीत सहभागी झाले होते. यावेळी गर्ग हे पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला होता.
आसाम पोलीसांच्या विशेष तपास पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गर्ग यांचा बँडमेट गोस्वामी हा पार्टीच्या व्हिडिओत दिसत आहे. तो गर्ग यांच्या अत्यंत जवळ पोहत होता. दरम्यान हा सर्व व्हिडिओ महंतानं आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. गेल्या सहा दिवसांपासून पोलीस या दोघांची चौकशी करत होते.
दरम्यान, गर्ग यांचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचा मॅनेजर श्यामकानू महंता यांना पोलिसांनी बुधवारीच अटक केली आहे. आता त्यांची गोस्वामी आणि महंता यांच्या सोबत चौकशी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी शर्मा आणि महंता यांच्यावर खूनाचा ठपका ठेवला आहे. त्यांच्यावर कट रचल्याचा देखील आरोप करण्याच आला आहे.
आसाम गुन्हे अन्वेशन विभागाच्या विशेष डीजीआय मुन्ना गुप्ता यांना सांगितलं की, 'सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मी आताच काही याबाबत भाष्य करू शकत नाही. मात्र आम्ही या प्रकरणात भारतीय न्याय संहितेअंतर्गत खूनाचा अतिरिक्त चार्ज लावला आहे.'
दरम्यान, गायक गर्ग यांची पत्नी गरिमा यांनी आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येकाला कोण कोणत्या गुन्ह्यात सामील आहे हे माहिती व्हायला हवं.