Instagram
मनोरंजन

Yuva Neta Marathi Movie | ‘युवानेता’ यादिवशी होणार प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याचं राजकारण, समाजकारण, नागरिकांची होणारी फरफट आणि त्यातून पेटून उठणारा एक 'युवानेता'. सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘युवानेता’ चित्रपटाच्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. लक्षवेधी शीर्षकामुळे तरुणांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता दिसत आहे. चित्रपट २३ ऑगस्ट २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. (Yuva Neta Marathi Movie)

महाविद्यालयातील अंकुर मित्रांसमवेत अन्यायाविरुद्ध नेहमी लढा देतो. अंकुरची वाढलेली लोकप्रियता स्थानिक आमदारास खुपू लागते. आमदार आपली शक्ती वापरुन अंकुरला दाबण्याचा प्रयत्न करतो. मात्र अंकुर न दबता तेवढ्याच त्वेषाने उभारी घेतो. या सर्व गदारोळात मित्र, प्रेम आणि नाती हरवतात का? आणि त्यांची किंमत मोजावी लागते का? हे चित्रपटात प्रकर्षाने कळणार आहे.

प्रकाश फिल्म्स प्रस्तुत युवानेता चित्रपट योगेश रमेश जाधव यांनी दिग्दर्शित केला आहे. राजू राठोड, जगदीश कुमावत यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथा अंकुर क्षीरसागर, पटकथा अमित बेंद्रे, संवाद भक्ती जाधव, अंकुर क्षीरसागर, अमित बेंद्रे, छायाचित्रण मयूरेश जोशी, कार्यकारी निर्माता कुणाल निंबाळकर, निर्मिती व्यवस्थापन रवी दीक्षित, प्रसाद कुलकर्णी, कला दिग्दर्शन नितीन बोरकर, दिलीप कंढारे, संकलन विशाल कोटकर, संगीत अमोल नाईक, नीलेश पाटील, गीत राजेश सांगळे, नितीन बागडे, नीलेश पाटील, रंगभूषा सुशांत वाघमारे, वेशभूषा स्मिता धुमाळ, साऊंड रेकॉर्डीस्ट योगेश क्षीरसागर, नृत्यदिग्दर्शन रोहन केंद्रा, मानसी कोवळे यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT