मुंबई - ‘तुम ही हो’ (आशिकी 2) सारखी ऐतिहासिक चार्टबस्टर गाणी देणारे अरिजित सिंग, मिथून आणि मोहित सूरी ही हिट संगीतिक त्रिकूट पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. सैयाराच्या पुढील गाण्यासाठी - ‘धुन’, जे आज यशराज फिल्म्सने प्रदर्शित केलं आहे.
मोहित सूरी आणि मिथून यांची मैत्री आणि संगीतिक सहकार्याला आता २० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या सहकार्याची सुरुवात २००५ मध्ये झहर आणि कलयुग पासून झाली. त्यांनी मर्डर 2, आशिकी 2, एक विलन, हमारी अधूरी कहानी, हाफ गर्लफ्रेंड, मलंग आणि आता सैयारा सारख्या हिट संगीत अल्बमवर एकत्र काम केलं आहे.
अरिजित सिंगचे मोहित सूरीसोबत तुम ही हो, चाहूं मैं या ना, हम मर जाएंगे (आशिकी 2), हमदर्द (एक विलन), हमारी अधूरी कहानी, फिर भी तुमको चाहूंगा (हाफ गर्लफ्रेंड), चल घर चलें (मलंग), आणि आता धुन (सैयारा) गाणी गायली आहेत .
सैयारा ही एक अत्यंत अपेक्षित प्रेमकथा आहे, ज्यामध्ये पहिल्यांदाच यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी एकत्र आले आहेत. या चित्रपटामध्ये अहान पांडे यशराज फिल्म्सचा नवा हिरो म्हणून पदार्पण करत आहे, तर अनीत पड्डा जी बिग गर्ल्स डोंट क्राय मालिकेतून खूप लोकप्रिय झाली, तिला नवी वायआरएफ हिरोईन म्हणून सादर केली जात आहे. यशराज फिल्म्स १८ जुलै २०२५ रोजी सैयारा चित्रपट जगभरात प्रदर्शित करत आहे.