Akshay Vashisht news updates file photo
मनोरंजन

Youtuber Akshay Vashisht | ''गोव्याच्या रनवेवर लाल साडीतील बाई..''प्रसिद्ध युट्यूबरने टाकला असा व्हिडिओ की..झाली अटक

Akshay Vashisht- 'गोव्याचा हॉन्टेड एअरपोर्ट..' प्रसिद्ध युट्यूबरने टाकला असा व्हिडिओ की..पोलिसांकडून झाली अटक

स्वालिया न. शिकलगार

youtuber vlogger akshay vashisht arrested

मुंबई - प्रसिद्ध यूट्युबर, कंटेंट क्रिएटर अक्षय वशिष्ठला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले आहे. गोवा – सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. मात्र काही वेळा हे प्रयोग धोकादायक ठरतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ कंटेंट अक्षयने प्रसिद्ध केला, ज्यामुळे त्याला अटक करण्यात आलीय. रिपोर्टनुसार, “गोव्याचा हॉन्टेड एअरपोर्ट” असा टॅग असलेला कंटेंट त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केला होता.

त्याच्यावर आरोप आहे की, त्याने असा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये खोटी आणि अफवा पसरवणारी गोष्ट आहे. त्याने व्हिडिओमध्ये दावा केला होता की, गोव्यातील इंटरनॅशनल विमानतळावर भूत आहे.

व्हिडिओ व्हायरल

तो व्हिडिओ काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. हजारो लोकांनी तो पाहिला आणि कॉमेंट्सचा पाऊस पडला. कुणी त्याला भूतबंगला म्हणाले, तर कुणी तो सिनेमातील सीनसारखा असल्याचं सांगितलं. मात्र प्रत्यक्षात हा सगळा प्रकार केवळ व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी आखण्यात आला होता.

असे आले प्रकरण समोर

हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा पणजीतील एका कॉन्स्टेबलने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या माहितीनुसार, वशिष्ठ आणि आणखी एकाने मिळून 'गोवा का हॉन्टेड एयरपोर्ट' टायटलने एक व्हिडिओ अपलोड केला. पोलिसांचे म्हणणे आहे की, या व्हिडिओमध्ये 'खोटे, दुर्भावनापूर्ण आणि अंधश्रद्धाळू आरोप' केले गेले, ज्यामुळे जनतेत भय आणि चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकत होता.

काय दाखवण्यात आले व्हिडिओमध्ये?

व्हिडिओमध्ये हा दावा करण्यात आला की, एअरपोर्ट एक जुन्या सम्शानभूमीवर बनवलं आहे आणि तिथे अनेकदा असामान्य घटना घडतात. व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, रनवेवर नेहमी रात्री लाल साडी घातलेली एक रहस्यमयी महिला दिसते. ज्यामुळे कधी कधी पायलट उड्डाण करण्यासाठी नकार देतात.

मीडिया रिपोर्टनुसार, युट्यूबर अक्षय वशिष्ठ विरोधात १५ सप्टेंबर रोजी गोवा पोलिसाच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने एफआयआर दाखल केली होती.

अक्षय वशिष्ठ का यूट्यूब चैनल काफी पॉप्युलर आहे आणि जवळपास ५.७२ लाख सब्सक्रायबर्स आहे. या चॅनलवर 'असली डरावनी कहानियां और केस स्टडीज' ऐकवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT