मनोरंजन

Poonam Pandey : माझ्याच गेममध्ये मला हरवलेस रणवीर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने अगदी लहान वयात मोठे स्थान मिळवले आहे. रणवीरने आपल्या टॅलेंटने, आत्मविश्वासाने आणि स्टाईलने सर्वांची मने जिंकली आहेत. खासकरून त्याच्या फॅशन सेन्समुळे तो अधिक चर्चेत असतो. मात्र, यावेळी तो आपले न्यूड फोटोशूट करून चर्चेत आला आहे. रणवीरने ज्या आत्मविश्वासाने हे फोटोशूट केले आहे, ते प्रत्येक अभिनेत्याला जमेल अशी गोष्ट नाही. त्यामुळे चाहतेही त्याचे कौतुक करत आहेत. वास्तविक रणवीरने पेपर मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये त्याची स्टाइल पाहायला मिळत आहे. (Poonam Pandey)

रणवीरच्या या फोटोशूटवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. कुठे कुणी टीका करतंय तर कुणी कौतुकाचे पूल बांधत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर फनी मीम्सचा पूर आला आहे. या सगळ्या दरम्यान सुप्रसिद्ध कलाकार पूनम पांडेनेही रणवीरच्या फोटोवर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

पूनमने ट्विटरवर रणवीर सिंहचे दोन फोटो शेअर करत लिहिले की, रणवीर सिंह, तू मला माझ्याच खेळात हरवले आहेस. पूनमच्या या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्सकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. कंगना राणौतच्या 'लॉकअप' या शोचा भाग झाल्यानंतर पूनम सतत चर्चेत असते.

मिमी चक्रवर्ती म्हणाली-

टीएमसी खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्तीनेही रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर तिने लिहिले की, "रणवीर सिंहचे ताजे फोटोशूट इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे आणि अधिकाधिक लोक अभिनेत्याचे कौतुक करत आहेत. फक्त आश्चर्य वाटते की तो एक स्त्री असती तरीही तुम्ही तिचे कौतुक केले असते का? तुम्ही तिचे घर जाळले असते, मोर्चा काढला असता, तिला जीवे मारण्याची धमकी दिली असती किंवा तिला शिवीगाळ केली असती?

मिमी एवढ्यावरच थांबली नाही, त्यानंतर तिने आणखी एक ट्विट केले, ज्यामध्ये तिने लिहिले, "आम्ही समानतेबद्दल बोलतो, ते आता कुठे येत आहे? तुम्हाला माहिती आहे की तुमचा दृष्टिकोण एकतर काहीतरी बदलू शकतो किंवा पूर्णपणे नष्ट करू शकतो." मिमीच्या या ट्विटची जोरदार चर्चा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT