Mahesh Babu family Yash Ramcharan Akhil Zainab Reception
मुंबई - सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा अखिल अक्किनेनीने जैनब रावदजीशी विवाह केला. आता दोघाचे रिसेप्शनचे फोटो व्हायरल होत आहेत. चित्रपट इंडस्ट्रीतील तमाम दिग्गजांनी या पार्टीला हजेरी लावली. या पार्टीमध्ये महेश बाबू, सूर्या, केजीएफ स्टार यश, रामचरण, नम्रता शिरोडकर यांनी उपस्थिती लावली. त्यांचे फोटोज व्हायरल होत आहेत.
अखिल अक्किनेनीने ६ जून २०२५ ला गर्लफ्रेंड जैनब रावदजीळी लग्न केले. रविवारी हैदराबादमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती. पार्टीत महेश बाबू, नम्रता शिरोडकर, राम चरण, उपासना कामिनेनी, यश, किच्चा सुदीप, व्यंकटेश दग्गुबाती, सूर्यासहित अनेक दिग्गज सहभागी झाले.
अखिलने व्हाईट सूट तर जैनबने पीच कलर फ्लोर-लेंथ गाऊन परिधान केला होता. अखिल-जैनबने नागार्जुन, अमला अक्किनेनी आणि जैनबच्या आई-वडिलांसोबत पोझ देताना दिसताहेत. एक ग्रुप फोटोमध्ये शोभिता आणि नागा चैतन्य देखील आहेत. तिने लाल रंगाची साडी नेसली होती.
आणखी एका फोटोत तेलुगू स्टार महेश बाबू, पत्नी नम्रता शिरोडकर, मुलगी सितारा देखील दिसत आहे. त्यांनी अखिल -जैनब, नागार्जुन आणि अमला यांच्यासोबत फोटो पोझ दिली. सूर्या शिवकुमार, दिग्दर्शक वेंकी एटलुरी, तेलंगानाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी देखील उपस्थित होते.