Yami Gautam Dhar post on extortion paid negativity Instagram
मनोरंजन

Yami Gautam Dhar | ही तर खंडणीच; पैसे न दिल्यास नकारात्मक पब्लिसिटीची धमकी देणाऱ्यांवर यामीचा संताप

Yami Gautam Dhar चा संताप उफाळला! “ही तर खंडणीच”, पैसे न दिल्यास नकारात्मक पब्लिसिटीची धमकी देणाऱ्यांवर कडक शब्दांत प्रहार

स्वालिया न. शिकलगार

यामी गौतम धरने पेड नेगेटिव्हिटीचा भांडाफोड करत, पैसे न दिल्यास नकारात्मक पब्लिसिटीची धमकी देणाऱ्यांना खंडणीवजा पद्धतींचा आरोप लावला आहे. तिच्या मते, अशा व्यवहारांमुळे प्रामाणिक कामाचे अवमूल्यन होते. ‘धुरंधर’ संदर्भात तिने ही संस्कृती थांबवण्याची मागणी केली आहे.

मुंबई -बॉलिवूडची चर्चित अभिनेत्री ने उद्योगातील बदलत्या वाईट पद्धतींवर आपला संताप व्यक्त केला आहे. तिने 'पेड प्रमोशन्स', 'पेड-नेगेटिव्हिटी' आणि 'हाईप प्री-पेड' कल्चरबाबत खुली नोट लिहिली आहे. तिच्या या व्यथित पोस्टमुळे पुन्हा एकदा ‘प्रमोशन-नेपोटिझम-कल्चर’ या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. तिने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, काही लोक किंवा संस्थाकडून पैसे न दिल्यास चित्रपटाबद्दल नकारात्मक पब्लिसिटी करण्याची धमकी दिली जाते आणि ही बाब सिनेउद्योगासाठी अत्यंत घातक आहे.

यामीने एका लांब पोस्टमध्ये लिहिलीय, अभिनय आणि चित्रपटासाठी आता पैशांचा आधार देऊन, चुकीच्या ब्रँडिंग/प्रेस्टेज होऊ लागल्या आहेत. काही लोक जर पैसे नाही दिलेत तर नकारात्मक लेखन किंवा ट्रोलिंग सुरू करण्याची धमकी देतात, यावर तिने प्रहार करत कडक शब्दात टीका केलीय.

यामीने स्पष्ट लिहिले की, आजकाल प्रामाणिक कामापेक्षा पैसे देऊन तयार केलेली हायप, प्लॅन केलेली निगेटिव्ह वृत्त आणि कृत्रिम इमेज बनवण्यास जास्त महत्त्व दिले जात आहे. जर तुम्ही पैसे देत नसाल, तर मोठे भासवले जाणारे काही प्रोफेशनल ग्रुप्स चित्रपटाला मुद्दाम वाईट दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व पद्धती खंडणीसारख्याच आहेत.

सिने उद्योगाला धोका

चित्रपटाच्या मार्केटिंगच्या नावाखाली पैसे देण्याची ही तथाकथित प्रवृत्ती, चित्रपटासाठी चांगला 'हायप' तयार करण्यासाठी आहे. पैसे दिले नाही तर चित्रपटाविषयी निगेटिव्ह इमेज बनवल्या जातात, निगेटिव्ह गोष्टी लिहिल्या जातात, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या गोष्टी घडत राहतात. जोपर्यंत तुम्ही 'त्यांना' पैसे देत नाही तोपर्यंत, एक प्रकारची खंडणी वाटते. ही व्यवस्था सहजपणे अंमलात आणली जाते, चित्रपट 'हाईप' करायचा की दुसऱ्या अभिनेत्याविरुद्ध/चित्रपटाविरुद्ध नकारात्मकता पसरवायची - ही बाब सिनेउद्योगाच्या भविष्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणार आहे, असे तिने पोस्टमध्ये नमूद केले आहे.

तिने पुढे नमूद केले, 'केवळ चांगल्या ‘हायप’ साठी नव्हे, तर चुकीच्या नेगेटिव्ह प्रचारासाठीही पैसे देण्याची पद्धत आता सामान्य बनली आहे. गेल्या ५ वर्षांत कोणते 'यश' मिळवले, याच्या नावाखाली लाखो गोष्टी उघड झाल्या आहेत. पण दक्षिणेत कोणीही असे काही करण्याचे धाडस करू शकत नाही. कारण त्यांच्यात सिनेउद्योग हा अनेक पातळीवर एकसंघ आहे. त्यांची एकजूट आहे. मी आमच्या आदरणीय निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना या टप्प्यावर अशा कल्चरला रोखण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करते.'

यामी गौतमने पेड प्रमोशन आणि त्याच्या दुष्परिणामाविषयी उघडपणे मत व्यक्त केलं आहे, तिच्या मते हे कल्चर सिने उद्योगाला हानिकारक आहे.

yami tweeted on x

शेवटी तिने हॅशटॅग धुरंधर असे लिहिले आहे. रणवीर सिंह स्टारर धुरंधर चित्रपट सध्या ट्रेंडवर आहे. सिनेप्रेमींमध्ये त्याची प्रचंड चर्चा आहे. दरम्यान, यामीने त्या चित्रपटाला हॅशटॅगमध्ये ठेवल्याने आता चर्चा रंगली आहे. अद्याप या पोस्टवर धुरंधर चित्रपटाच्या टीमकडून कुठलेही उत्तर आलेले नाही.

यामीच्या या पोस्टवर ऋतिक रोशनने आपली प्रतिक्रिया दिलीय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT